पुण्यात महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात, झाला गुन्हा दाखल

उपसरपंच बाई कोरोना विसरल्या आणि दणक्यात दिली बर्थडे पार्टी, पण....

उपसरपंच बाई कोरोना विसरल्या आणि दणक्यात दिली बर्थडे पार्टी, पण....

  • Share this:
पुणे, 06 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यतील खेड तालुक्यातील शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात केलेला वाढदिवस त्यांना चांगलाच महागात पडला आहे. गावात कोरोनाचे दहा रुग्ण असल्यामुळे गाव कंटेन्टमेंट झोनमध्ये असताना या उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावरून सहकारी पण विरोधक असलेल्या माजी उपसरपंचासह 6 सदस्यांनी या उपसरपंचांच्या विरोधात गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच 188 कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी! जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले 10 रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थीगळे, विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत, उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात आजही आहे मुसळधार पावसाचा इशारा? वाचा हवामान खात्याचा अंदाज दरम्यान, पुणेकरांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय आज महापालिकेने घेतले आहेत. Coronavirus मुळे लागू असलेला लॉकडाऊन प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असला तरी अन्य सर्व शहर खुलं केलं जाणार आहे. दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखेचं बंधन आता नसेल. शिवाय  दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पुणेकरांवर असलेली पाणीकपातीची टांगती तलवारसुद्धा सध्यापुरती हटवण्यात आली आहे. पुणे महापालिकेने दोन महत्त्वाचे निर्णय घेत आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्याच्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती. पण तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: