मुंबई, 06 ऑगस्ट : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने वादळाचं रुप धारण केलं आहे. दोन दिवसापासून सतत पावसाची जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहे. अनेक रेल्वे स्थानकांत पाणी साचलं आहे. या दोन दिवसाच्या पावसाने तब्बल 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे. प्रत्येक एक किलोमीटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे वाहतुक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे मंत्रकाय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक झाड उन्मळून पडली आहेत. अशात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजही हवामान खात्याकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. अजूनही पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलीस आयुक्त, प्रशासन आणि मंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीविषयी बुधवारी चर्चा केली. केंद्राकडून शक्य असेल ती सर्व मदत दिली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं.
मुंबईसह उपनगरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाल, घरात धबधबा सुरू, पाहा VIDEO
मुंबईत पावासाचा कहर सुरू आहे. काल दिवसभरात मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 300 मिमीच्या वर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं.
मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारी दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. आता उपनगरांतही जोर वाढला आहे. ठाण्यातही संध्याकाळापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठाण्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांनी नागरिकांनी बाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे.
राम मंदिराच्या आनंदात सत्कार स्वीकारतानाच कारसेवकाने सोडले प्राण
जोरदार पावसाबरोबर तुफानी वाराही मुंबईत होता. मुंबईत आज किनारी भागात ताशी 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. अनेक इमारतींवर असलेली होर्डिंग्ज वाकली. अनेक झाडं रस्त्यावर पडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.