Home /News /pune /

2 मुलं गाळात रुतली, वाचवायला वडिलांनी मारली पाण्यात उडी, तिघांचाही दुर्दैवी मृत्यू

2 मुलं गाळात रुतली, वाचवायला वडिलांनी मारली पाण्यात उडी, तिघांचाही दुर्दैवी मृत्यू

पावसाचा आनंद घेण्यासाठी दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहायला गेले होते.

    आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 25 जुलै: राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील  मावळ (Maval) तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे धबधब्याच्या ओढ्यात बुडून दोन लहान मुलांसह वडिलांचा (father) बुडून (drowned) मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे मावळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिराजी गणपती सुळे (वय 40) साईनाथ पिराजी सुळे (वय 14) आणि सचिन पिराजी सुळे (वय 11) सर्व राहणार इंद्रायणी कॉलनी कामशेत, मुळगाव नायगाव वाडी  जि.नांदेड अशी मृत्यू पावलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. Weather Update: पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचा ब्रेक? काय असेल कोकणातील स्थिती? आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पिराजी सुळे यांनी पावसाचा आनंद घेण्यासाठी दोन्ही लहान मुलांना सोबत घेत कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेले होते. धबधब्याच्या पायथ्याशी पाण्याच्या प्रवाहाने ओढे तयार झाले आहे. या ओढ्यात लहान मुले खेळत असताना चिखल तसंच मातीच्या गाळामध्ये रूतून बूडू लागले. त्यांचा आवाज ऐकून पिराजी यांनी सुद्धा पाण्यात उडी मारली. परंतु, खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पिराजी यांचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. भारतीय हवाई दलात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; 'या' जागांसाठी करा अर्ज जवळच एक गुराखी आपली जनावरं चरवत होता. त्याने आरडाओरडा करून इतर ग्रामस्थांना मदतीसाठी बोलविले. त्यानंतर मदतकार्य दरम्यान ग्रामस्थांना तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कामशेत परिसरात पिराजी हे अनेक महिन्यांपासून मजुराचे काम करत होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुखी पडल्याची घटना कळताच त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.  संबंधित घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस पोलीस करत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या