Home /News /career /

भारतीय हवाई दलात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; 'या' जागांसाठी आजच करा अर्ज

भारतीय हवाई दलात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; 'या' जागांसाठी आजच करा अर्ज

अप्लाय करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.

    नवी दिल्ली, 25 जुलै:  भारतीय हवाई दलात (Indian Air Force Recruitment 2021) दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच मोठी पदभरती (10th 12th jobs) होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप ‘सी’ सिविलियन- कुक, मेस स्टाफ, हाउस कीपिंग स्टाफ, एमटीएस, हिंदी टाइपिस्ट, एलडीसी, स्टोर कीपर, वाडी, पेंटर, अधीक्षक.आणि चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. तब्बल 85 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे. या पदासाठी भरती ग्रुप ‘सी’ सिविलियन (Group ‘C’ Civilian) कुक (Cook) मेस स्टाफ (Mess Staff) हाउस कीपिंग स्टाफ (House Keeping Staff) एमटीएस (MTS) हिंदी टाइपिस्ट (Hindi Typist) एलडीसी (LDC) स्टोर कीपर (Store Keeper) वाडी (Carpenter) पेंटर (Painter) अधीक्षक.(Superintendent) चालक (Driver) हे वाचा -  घरबसल्या करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेतीबद्दल माहिती आहे का? कमाईचा चांगला मार्ग शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता पात्र उमेदवारांनी त्यांच्या पदानुसार जाहिरातीत देण्यात आलेल्या एअर फोर्स स्टेशनला अर्ज पाठवायचे आहेत. अधिक माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job alert

    पुढील बातम्या