पिंपरी, 23 मे: देशात कोरोना विषाणूची दुसऱ्या लाट (Corona virus 2nd Wave) आल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं (Corona patient death) प्रमाणही वाढलं आहे. परिणामी दररोज असंख्य रुग्णांचा मृत्यू होतं आहे. अशातच पिंपरीतील (Pimpari) एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना विषाणूनं (Coronavirus) संबंधित कुटुंबातील दोन कर्त्या लेकरांचा (Two brother died) घास घेतला आहे. काही दिवसांत लग्न होणार याची स्वप्न रंगवणाऱ्या मुलाचा कोरोनानं घात केला आहे. त्यामुळे संसार थाटण्यापूर्वीच विखुरला आहे. आदित्य आणि अपूर्व अशी या दोन मृत भावंडांची नावं आहेत. आदीत्यचं दीड वर्षापूर्वी लग्न झालं होतं. तर अपूर्वचं लग्न ठरलं होतं. येत्या दिवाळीत तो विवाहबंधनात अडकणार होता. पण कोरोनानं त्याचं स्वप्न हिरावलं आहे. या दोघांसोबतचं आई-वडील आणि आदित्यची पत्नी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या पाचही जणांना पिंपरीतील वेगवेगळ्या रुग्णालयांत (Hospital) दाखल करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूला हरवून पुन्हा एकत्र येऊ असा सर्वांना विश्वास होता. ते सर्वजण एकमेकांना फोन करून धीर देत होते. पण दोघां सख्ख्या भावांनी कोरोना विषाणूपुढे हार पत्करली आहे. ऑक्सिजन पातळीत घट झाल्यानं शुक्रवारी दुपारी अपूर्वनं आणि शनिवारी पहाटे आदित्यनं जगाचा निरोप घेतला आहे. तर, वडील पुण्यातील वायसीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दुसरीकडे सासू आणि सून कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण दोन कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्यानं त्यांना आपल्या अश्रूंचा बांध आवरता येत नाहीये. विशेष म्हणजे आपली दोन मुलं आपल्यापासून हिरावली असल्याची पुसटशीही कल्पनाही मृतांच्या वडिलांना नाही. हे वाचा- …अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना दत्तवाडी आकुर्डी येथील रहिवासी असणारे विजय जाधव याचं मध्यमवर्गीय सुखी कुटुंब होतं. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी संसाराचा गाडा हाकलला होता. दोन्ही मुलांना चांगल्या ठिकाणी कामाला होती. घरात सर्वकाही सुखात सुरू होतं. पण अचानक कोरोनानं यांच्या आयुष्यात काळ म्हणून प्रवेश केला. आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं. घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वजण लवकरच बरं होऊन परतू असा विश्वास घेऊन रुग्णालयात गेलेल्या या दोन्ही भावंडांचा काही तासांच्या अंतरानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.