अनिस शेख, प्रतिनिधी लोणावळा, 13 जून: कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) नियमांत शिथिलता आणत व्यवहार, सेवा सुरू करण्यास काही प्रमाणात परवानगी दिली. मात्र, अद्यापही पूर्णपणे निर्बंध उठवण्यात आलेले नाहीयेत. पर्यटनस्थळांवरही बंदी (Tourist spot closed) घालण्यात आली आहे. पण तरीही नागरिकांनी राज्यातील विविध पर्यटनस्थळांवर तोबा गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे सुद्धा वाहू लागले (waterfall) आहेत. याच धबधब्यांवर आता पर्यटकांनी नियमांचं उल्लंघन करत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन स्थळांवर बंदी असतानाही नागरिक धबधब्यांवर गर्दी करत आहेत. नागरिकांची ही गर्दी म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरणार असे दिसत आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) June 13, 2021
लोणावळ्यातही पर्यटकांची गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अद्याप कमी झालेला नसल्याने जिल्हाधिकारी यांनी पुणे जील्हयातील ग्रामीण भागात कोरोना बाबतचे नियम अद्याप शिथिल केलेले नाहीत. तसेच पर्यटन स्थळावरील ही बंदी उठवण्यात आलेली नाही. मात्र पावसाची सुरुवात होताच पर्यटकांची पावले लोणावळा आणि खंडाळाकडे वळू लागली आहेत. या कारणाने पर्यटन बंदीच्या आदेशाला धुडकावून सध्या लोणावळा (Lonavala) आणि खंडाळ्यात (Khandala) पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे, त्यामुळे शहरातील पर्यटनस्थळाकडे (Tourist spot) जाणारे सर्वच रस्ते पर्यंटंकाच्या वाहनांनी जाम झाले आहेत. वाहनकोंडी सोडवता पोलिसांचीही दमछाक झाली आहे. Corona test आली अंगाशी! सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक; पाहा पुढे काय घडलं बदलापुरात पर्यटकांची गर्दीच गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश लागू करण्यात आलेत. साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र असे असतांना सुद्धा आज विकेंडच्या रविवारी पर्यटकांनी धबधब्यावर मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे साहजिकच इथे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर **(Badlapur)**मधील पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालणारा कोंडेश्वर धबधब्यावरदेखील प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. मात्र काही पर्यटक पोलिसांनी नजर चुकवून इथे दाखल झाले आहेत. तर काही हौशी आणि हुशार पर्यटकांनी तर प्रतिबंधात्मक आदेशात नमूद नसलेल्या कोंडेश्वर धबधब्या पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचं पालन कोणीच करतांना दिसले नाही.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश तर लागू केले,मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडते आहे असे म्हणावे लागेल.