मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आता तरी घरात बसा...! राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 167, मुंबईत सापडले 7 नवे रुग्ण

आता तरी घरात बसा...! राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 167, मुंबईत सापडले 7 नवे रुग्ण

मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांनी घरातून बाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केलं आहे.

मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांनी घरातून बाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केलं आहे.

मुंबईतला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांनी घरातून बाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केलं आहे.

मुंबई 28 मार्च : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढतच आहे. हा आकडा आता 167वर पोहोचला आहे. त्यात मुंबईत 7 नव्या रुग्णांची भर पडली. तर नागपूरमध्ये 1 जण आढळलाय. असे 8 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 4 महिला आणि 3 पुरुष दाखल आहेत.

सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्ण आढळले होते. सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 167 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे.

मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; या 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे.  भारतात आतापर्यंत 834 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं असून एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 75 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या दोन महिन्यात परदेशातून भारतात आलेल्या प्रवशांची देखरेख करण्याची गरज असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन महिन्यांत परदेशातून भारतात जवळपास 15 लाख प्रवासी आले आहेत.

वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona