• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • ऐन दिवाळीत चोरट्यांचा साडेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, पाडवा पहाट पडली महागात

ऐन दिवाळीत चोरट्यांचा साडेचार लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, पाडवा पहाट पडली महागात

पुण्यात चोरट्यांनी दिवाळीच्या दिवशी घरात घुसून दागिने लंपास केले. घटनेत दागिने व दहा हजारांची रोख रक्कम अशी साडेचार लाखांची चोरी झाली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 • Share this:
  पुणे, 6 नोव्हेंबर : ऐन दिवळीत (Diwali 2021) घरातील साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने आणि पैशांवर चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडीतील गणेशनगर परिसरात घडली आहे. दिवाळी पाडवा पहाटेनिमित्त (Diwali Pahat) घरातील मंडळी बाहेर गेल्याने चोरींनी संधी साधून दागिन्यावर डाव मारला. टीव्ही 9 वृत्तानुसार, दिवाळी पाडव्याच्या आधी लक्ष्मीपूजनासाठी महिलेने घरातील दागिने आणि पैसे देवघरात ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दागिने तसेच देवघरात ठेवत महिला पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला गेली. मात्र नेमका घराचा दरवाजाही नीट लावला नाही. त्यामुळे चोरट्यांनी घरात घुसून दागिने लंपास केले. मात्र महिलेचा पाडवा पहाट कार्यक्रमाचा आनंद फार काळ टिकला नाही. कार्यक्रमातून घरी आल्यानंतर घरातील चोरीच्या घटनेनं महिलेची पायाखालची जमीन सरकली. घटनेत महिलेचे दागिने व दहा हजारांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाडव्याच्या दिवशी कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश;सांगलीत तिघींचा ओढ्यात बुडून अंत पुण्यात IAS अधिकाऱ्याच्या घरात जबरी दरोडा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील मुंढवा परिसरात जबरी चोरीची (Robbery in pune) घटना घडली आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला आहे. यावेळी चोरट्यांनी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण 43 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला (Theft 43 lakh worth ornaments and cash) आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जबरी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून भामट्यांचा शोध घेतला जात आहे. ठाणे: पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने बापलेकास बेदम मारहाण; लोखंडी रॉडने केले वार याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्यांचे पुत्र सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. दरम्यान गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत 43 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: