पुणे, 15 फेब्रुवारी : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यभरात बाजारपेठा सुरू झाल्या आहे. कोरोनावर लस सुद्धा उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण, पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधितांचा दर हा 10 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाचा दर (positivity rate) 10 टक्के झाला आहे. शहरात काही काळ कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र. 7 फेब्रुवारी पासून संसर्ग प्रमाण वाढू लागले आहे. 1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान दैनंदिन वाढ साडेचार ते साडेपाच टक्के नोंद होती. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दैनंदिन वाढ साडेसहा ते दहा टक्के इतकी झाला आहे.
7 फेब्रुवारी रोजी शहरात रुग्णसंख्या 196 इतकी होती. यासाठी 2906 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 6.74 टक्के संसर्गाची टक्केवारी होती. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या 162 होती तर चाचण्या 1945 करण्यात आली होती. दर हा 8.32 टक्के इतका होता. दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या 216 वर पोहोचली. टक्केवारी 9.67 टक्के इतकी होती. तर 10 फेब्रुवारी रुग्णसंख्या 239 झाली टक्केवारी 7.19 इतकी होती. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी रुग्ण संख्या 256 वर पोहोचली. 3230 चाचण्या घेण्यात आल्या होत्या, टक्केवारी 7.92 होती. 12 फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या 258 वर पोहोचली. त्यानंतर 13 फेब्रुवारी रुग्णसंख्या 331 वर पोहोचली आणि टक्केवारी 9.17 इतकी होती. रविवारी 14 फेब्रुवारी रुग्णसंख्या 354 वर जाऊन पोहोचली. शहरात 3508 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे संसर्गाची टक्केवारी 10.09 इतकी होती.
देशातील एकूण रुग्णांपैकी 24 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. मात्र 100 पैकी 96 रुग्ण बरे होत आहेत. नव्याने संसर्गाचं राज्यात प्रमाण 1.6 टक्के आहे. देशाच्या तुलनेत सक्रिय(positive) रुग्ण राज्यात 24.7टक्के आहेत. तर केरळमध्ये 47.2 टक्के रुग्ण आहेत. राज्यात 9 मार्चला 2 रुग्ण आढळले. 13 फेब्रुवारीला 3 हजार 269 सक्रिय रुग्ण आहेत. 11 एप्रिल 2020ला 7.2 टक्के इतका सर्वाधिक मृत्यू दर राज्यात होता. आता 2.5 टक्के मृत्यू दर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.