बारामती, 29 नोव्हेंबर: समाजात अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात असल्याचं चित्र आहे. तिसरीही मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आईनंच आपल्या कोवळ्या जीवाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगावच्या रामनगरमध्ये घडली आहे.
हेही वाचा..दोन्ही राजेंचं सामाजिक नेतृत्त्व मान्य, पण... मराठा समन्वयकाचं मोठं विधान
25 तारखेला दुपारी सव्वा महिन्याच्या मुलीला पाळण्यात झोपवून आई झोपी गेली. आई उठल्यावर उठल्यावर बाळ पाळण्यात नव्हते. अधिक शोधा शोध केली असता ते घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आले. त्यानंतर त्या बाळाला दवाखान्यात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर कुटुंबीयानं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून केली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता हे कृत्य आईनेच केलं असल्याचं उघड झालं आहे.
पाण्याच्या टाकीत टाकलं बाळ...
सव्वा महिन्याची बाळ दुपारी झोपल्यानंतर आईनं बाळाला घराजवळील पाण्याच्या टाकीत टाकलं. बाळ रडल्याचा आवाज येऊ नये म्हणून टाकीचे झाकण लावलं होतं. काही क्षणातचं कोवळ्या जीवानं प्राण सोडला, अशी माहिती आरोपी आईनं पोलिसांनी दिली.
दीपाली झगडे असं महिलेचं नाव आहे. तिनं पोलिसांना सांगितलं की, या याआधी दीपालीला 2 मुली झाल्या होत्या. तिला तिसरा मुलगा हवा होता. पण तिसरीही मुलगीच झाली. त्याच रागातून माहेरी आलेल्या दीपालीने सव्वा महिन्याच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली. माळेगाव पोलिसांनी दीपाली झगडेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अशीच घटना दोन दिवसांपूर्वी हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात घडली होती. पिपरौली गावात जन्मदात्या आईनेच आपल्या चार मुलींची हत्या केली आहे. चारही मुली झोपल्या असताना ही घटना घडली. धारदार शस्त्राने चौघींचाही गळा कापण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. चार निरपराध मुलींच्या रक्ताने संपूर्ण घर शोकाकूल झालं होतं.
हेही वाचा...पत्नी..प्रेयसी आणि कारस्थान! 16 दिवसांनंतर अखेर बेपत्ता मृतदेहाचं गूढ उघड
पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून आरोपी आईला अटक केली आहे. हा प्रकार खरंच त्रस्त करणारा आहे. अद्यापही मुलगे व मुलींमध्ये भेद केला जातो. महिलांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केलंय पण समाजाचे विचार केव्हा बदलणार? असा सवाल या दोन्ही घटनांनतर उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.