जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / राष्ट्रवादी कार्यकर्ता गोट्याभाऊच्या लग्नाला डीजेवर गाव थिरकले, कोरोना नियम पायदळी तुडवले VIDEO

राष्ट्रवादी कार्यकर्ता गोट्याभाऊच्या लग्नाला डीजेवर गाव थिरकले, कोरोना नियम पायदळी तुडवले VIDEO

राष्ट्रवादी कार्यकर्ता गोट्याभाऊच्या लग्नाला डीजेवर गाव थिरकले, कोरोना नियम पायदळी तुडवले VIDEO

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पण, या लग्नासोहळ्यात सर्वच नियमांना

  • -MIN READ
  • Last Updated :

जुन्नर, 28 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठिकठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडताना दिसत आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गोट्याभाऊ वाघ यांच्या लग्नात रात्री उशिरापर्यंत डीजे, लाईट सिस्टीम सुरू ठेवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात गोट्याभाऊ वाघ याचे लग्न पार पडले. पण या लग्नाला सर्वच नियम पायदळी तुडवण्यात आले. लग्न सोहळ्याला 200 लोकांची मर्यादा असतानाही 1 हजाराच्यावर लोकं उपस्थित होते तर वरातील सुद्धा तीच अवस्था होती.

विशेष म्हणजे, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पण, या लग्नासोहळ्यात सर्वच नियमांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवण्यात आल्या होत्या. नो सोशल डिस्टंट, नो मास्क आणि कारवाईसाठी पोलीस गेले तर पोलिसांवर दादागिरी केली गेली. 27 फेब्रुवारीला दिवसभर या लग्न सोहळ्याला जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पारनेरचे आमदार निलेश लंके,उपस्थित होते. सत्ताधारी आमदारांनी जर अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना लगाम घातला नाही. दाद कुणाकडे मागायची? असा या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर शनिवारी रात्री या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी कोरोना काळात अशाच गर्दीवर आवर घालण्याची विनंती केली असताना कार्यकर्ते मात्र, मात्र बेफाम वागताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात