Home /News /pune /

'देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल'

'देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल'

'तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेलं नाही. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. तेही बायका पोरांना घेवून देखावे बघायला येतात. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढू.'

    पुणे 21 ऑगस्ट : महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपल्या वक्तव्यामुळे कायम वादात सापडतात. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे नव्याने वाद होण्याची शक्यता आहे. देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यांना जसं वाटतं तसा देश चालेल असं मत त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधाचे सूर उमटत आहेत. भारताची घटना ही धर्मनिरपेक्ष आहे आणि देश घटनेनुसार चालतो. भारतात सर्वच धर्मांना समान अधिकार आहेत त्यामुळे राज्यांचे महत्त्वाचे मंत्री असं विधानच कसं करू शकतात अशी टीका विविध सामाजिक संघटनांनी केलीय. चंद्रकांत पाटील हे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित गणेशोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आणि प्रशासनातर्फे अनेक अटी लादल्या जातात. देखावे पाहण्यावर निर्बंध लावले जातात. अशा अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर बोलताना ते म्हणाले, तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेलं नाही. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. तेही बायका पोरांना घेवून देखावे बघायला येतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा काढून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं. खबरदार! गणेशोत्सवात वर्गणीसाठी जबरदस्ती केली तर खंडणीचा गुन्हा लागणार प्रशासन म्हणजे आपले विरोधक आहेत ही भावना मनातून काढून टाका असंही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये फक्त गणेशोत्सवावरच नाही तर अनेक सार्वजनिक उत्सवांवर अनेक बंधनं आली आहेत. उत्सवाचं होत असलेल्या बाजारीकरणामुळे कोर्टात याचिका दाखल केल्या जातात आणि कोर्ट निर्णय देतं. त्यामुळे अनेक उत्सवांवर बंधनं आली आहेत. तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनालाही काही उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळे उत्सव मंडळांना त्यांचा त्रास होतो.

    मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून!

    यात दोनही बांजूंच्या भावनांचा विचार केला पाहिजे असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. उत्सवाचा आनंद, त्याचं सामाजिक महत्त्व हे खरं असलं तरी त्याला सध्या बिभत्स रुप आलंय. कर्कश्य आवाजात गाणी लावणं त्यावर ओंगळवाणं नृत्य करणं आणि पैशांची वारेमाप उधळपट्टी करणं याचं प्रमाण वाढल्याने उत्सवाचं स्वरुपच बदललंय. पण बहुसंख्यवादाच्या आडून भाजपकडून हिंदू कट्टरतावादाचं बीज पेरलं जात असल्याचा आरोपही केला जातोय.
    First published:

    पुढील बातम्या