मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे जिल्ह्यातील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याला अटक, असा लागला पोलिसांना सुगावा

पुणे जिल्ह्यातील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याला अटक, असा लागला पोलिसांना सुगावा

पोलिसांनी केलेल्या या कामगिरीच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी केलेल्या या कामगिरीच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी केलेल्या या कामगिरीच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

पिंपरी चिंचवड, 4 जून : सोन्याचा शर्ट घातल्यामुळे चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड मधील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 देशी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी  पेरॉलवर बाहेर आला होता, तेव्हापासून त्याने भोसरी परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

त्याच्याकडे पिस्टल असल्याचंही अनेकांनी बघितलं होतं. मात्र त्याच्या भीतीने कुणीच पोलिसांकडे तक्रार करत नव्हतं. मात्र एका सजग नागरिकाने कृष्ण प्रकाश यांना व्हॉट्सअॅपवर मसेज करून धौलपुरीया बद्दल माहिती दिली आणि त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलबद्दलही सांगितलं. तेव्हा कृष्ण प्रकाश यांनी तत्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी पाठवून मोठ्या शिताफीने धौलपुरीयाला अटक केली. केवळ व्हॉट्सअॅप आलेल्या एका मॅसेजवरुन पोलिसांनी केलेल्या या कामगिरीच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तर शहरात कुठेही गैरप्रकार सुरू असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा किंवा मॅसेज करून कळवा, असं आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

हे ही वाचा-पुणेकरांसाठी गुड न्यूज! रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक, लसीकरण 11 लाखांच्या वर

कोण होता गोल्डमन दत्ता फुगे

कक्का धौलपुरीया अटक झाल्यामुळे गोल्ड मॅन दत्ता फुगे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भोसरी परिसरातील रहिवासी असलेले फुगे यांना सोनं परिधान करण्याची प्रचंड हौस होती. याच हौसे पोटी फुगे यांनी तब्बल 3 किलो सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता, ज्यामुळे फुगे यांची गोल्डमन म्हणून जगभर ओळख निर्माण झाली होती. मात्र याच खोट्या प्रतिष्ठेपायी फुगे यांचे अनके शत्रू तयार झाले. फुगे वक्रतुंड नावाने चिटफंडही चालवायचे. ज्यामध्ये त्यांनी अफरातफर केल्याचे आरोपही झाले होते आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने फुगे अनेक आर्थिक व्यवहार वादात सापडले आणि अशाच एका आर्थिक व्यवहारातुम 15 जुलै 2016 ला दिघी परिसरातील भारतमाता नगर येथे धौलपुरीयायाने आपल्या इतर साथीदारांसह गोल्डमम फुगेचा दगडाने ठेचून खून केला होता.

आता भोसरी पोलिसांनी धौलपुरीयाला अटक केलीय खरी, मात्र गोल्डमन फुगेच्या हत्ये प्रकरणी शिक्षा भोगूनही तो सुधारला नाही आणि त्याने पुन्हा गुनेहगारी क्षेत्रात मुक्त संचार ठेवत घातक शस्त्रसाठा बाळगल्याच बाब ह्या निमित्ताने पुढे आल्याने धौलपुरीया सारख्या आरोपींना पोलीस आणि कायद्याची जरब का बसली नसेल असा प्रश्न निर्माण झाला आहे .

First published:
top videos

    Tags: Crime news, Pimpari chinchavad, Pune