सोलापूर, 10 मे : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजणी धरणाचे पाणी इंदापूरला (indapur) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सोलापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आज सिंचन भवनात बोलावलेल्या बैठकीतच जलसंपदा राज्यमंत्री दत्ता भरणे (Data bharne) यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी भिडले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.
उजनीचं (Ujani dam) पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंचन भवनात राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी बैठक बोलावली. पण, या बैठकीत दत्ता भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाला.
सोलापूरच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बोलवून दत्ता भरणे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचं सांडपाणी वळवणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे सोलापूरचं पाणी पळवल्याच्या विरोधात शेतकरी सिंचन भवनावर मोठ्या संख्येने जमणार असल्याच्या घोषणेनंतर सिंचन भवनाला मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या दोन किचनमधल्या गोष्टी फुफ्फुसांसाठी उपयुक्त; ऑक्सिजनची पातळीही राहील नीट
दरम्यान, 'शेवटचा तालुका असल्याने इंदापूर मधल्या नागरिकांवर अन्याय होतोय. इंदापूरसाठी घेतलेलं पाणी सोलापूरचं नाही, सोलापूरचा एक ठिपका ही कमी होणार नाही, असं सांगत जर सिद्ध करून दाखवलं की, मी सोलापूरचं पाणी इंदापूरला नेतोय, तर मंत्रिपदच नाही तर आमदारकीचा ही राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन', अशी भूमिका जलसंपदा राज्य मंत्री दत्ता भरणे यांनी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.