मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या दोन किचनमधल्या गोष्टी फुफ्फुसांसाठी उपयुक्त; ऑक्सिजनची पातळीही राहील व्यवस्थित

या दोन किचनमधल्या गोष्टी फुफ्फुसांसाठी उपयुक्त; ऑक्सिजनची पातळीही राहील व्यवस्थित

Home remedies: फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याच प्रकारचे घरगुती उपाय करता येऊ शकतात.

Home remedies: फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याच प्रकारचे घरगुती उपाय करता येऊ शकतात.

Home remedies: फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याच प्रकारचे घरगुती उपाय करता येऊ शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 मे : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Second Wave) चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांना दवाखान्यांमध्ये जागाही मिळत नाही, अशी स्थिती आहे. कोरोनामुळे लोकांच्या शरिरात ऑक्सिजनची (Lack of Oxygen) कमतरता भासू लागले. ऑक्सिजनअभावी रुग्णावर जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. कोरोना फुफ्फुसांवर (Lungs) वाईट परिणाम करतो ज्यामुळे ते अशक्त होतात. अशा परिस्थितीत आपली फुफ्फुसे मजबूत असणे आवश्यक आहे. केवळ निरोगी फुफ्फुसे आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवू शकतात. निरोगी फुफ्फुसांमुळे हृदयदेखील निरोगी असते. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याच प्रकारचे घरगुती उपाय करता येऊ शकतात. यापैकी एक उपाय म्हणजे तुळशी आणि लवंगेचं मिश्रण. या मिश्रणात आपण इतरही काही गोष्टी घालून घेऊ शकतो, यामुळे फुफ्फुसांचे कार्य चांगले राहते.

फुफ्फुसांना निरोगी ठेवणे आवश्यक

कोरोना विषाणूच्या स्वरुपात झालेल्या बदलामुळे नवा विषाणू प्रकार फुफ्फुसांवर हल्ला करत आहे. त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य बिघडते. फुफ्फुसांची कार्यक्षमत नीट होत नसल्यानं मग शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. शरीरात ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. म्हणूनच, फुफ्फुसांना निरोगी ठेवणं फार महत्त्वाचं बनलं आहे. आम्ही आपल्याला काही घरगुती उपचारांबद्दल माहिती सांगू ज्याद्वारे आपण आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकता. या गोष्टी आपल्या घरात सहज उपलब्ध असतात.

हे मिश्रण कसे वापरावे

फुफ्फुसांना बळकटी आणण्यासाठी, थोडं जेष्ठमध, काळी मिरी आणि लवंग एकत्र करून 4-5 तुळशीची पाने, थोडी साखर आणि थोडी दालचिनी घालून तोंडात हळूहळू चावत रहावे. तुम्हा शक्य असल्यास आपण हे दररोज करू शकता. दम्याच्या रुग्णांनादेखील या प्रक्रियेचा फायदा होतो.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधामध्ये व्हिटॅमिन बी आणि ई तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, कोलीन, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिकॉन, प्रथिने, ग्लायसरिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बायोटिक असे भरपूर औषधी गुणधर्म असतात. सर्दी, खोकला, ताप असल्यास किंवा फुफ्फुसांनाही याचा फायदा होतो.  जेष्ठमध 5 ग्रॅम पावडरच्या स्वरुपात घ्यावी.

हे वाचा - कोरोनाकाळ आणि लग्नही जमत नाही! मानसिक खच्चीकरण झालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

तुळस

तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, लोह, क्लोरोफिल मॅग्नेशियम, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी असते जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी 4-5 तुळशीची पाने चावून खावीत.

हे वाचा - कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी सहा वर्षांपासून सुरू होता चीनचा प्लॅन? धक्कादायक माहिती आली समोर

लवंगा

लवंग अनेक गुणांनी समृद्ध आहे. युजेनॉल नावाचा घटक लवंगमध्ये आढळतो. यामुळे ताणतणाव, पोटाचे विकार, पार्किन्सन, शरीर दुखणे यासारख्या समस्यांवर फायदा होतो. अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्मांव्यतिरिक्त, लवंगामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, थायमिन आणि व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी अॅसिडसारखे आवश्यक घटक यात आढळतात. हे हृदय, फुफ्फुस, यकृत मजबूत ठेवते आणि पाचक प्रणाली देखील निरोगी ठेवते.

दालचिनी

दालचिनीचा वापर फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी करता येतो. दालचिनी थायमिन, फॉस्फरस, प्रथिने, सोडियम, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, नियासिन, कर्बोदकांनी समृद्ध आहे. याशिवाय हे अँटी-ऑक्सिडेंटचा चांगला स्रोत मानला जातो. फुफ्फुसांना कार्य चांगले ठेवते आणि हृदय निरोगी ठेवते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही हमी घेत नाही. या गोष्टींचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)

First published:

Tags: Coronavirus, Health Tips, Oxygen supply