Corona: पुणेकरांची चिंता वाढली; दैनंदिन रुग्णसंख्या 6 हजारांवर, मृतकांचा आकडाही वाढला

Corona: पुणेकरांची चिंता वाढली; दैनंदिन रुग्णसंख्या 6 हजारांवर, मृतकांचा आकडाही वाढला

Coronavirus in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बातमी आहे कारण, पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

  • Share this:

पुणे, 17 एप्रिल: राज्यातील महत्त्वाच्या शहरांत कोरोना विषाणूचा (Coronavirus) विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Coronavirus patient increase in Pune) होत आहे. पुण्यासाठी चिंतेची बाब म्हणजे आता दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज पुण्यात नव्याने नोंद झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येने 6 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ बाधितांच्या संख्येतच वाढ होत नाहीये तर मृतकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

आज पुणे शहरात 6006 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 75 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 21 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. सध्यस्थितीत पुण्यात 1236 रुग्ण हे गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात पुण्यातील 5609 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 360803 इतकी झाली असून सध्यस्थितीत 54967 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 6056 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 2,99,780 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आज दिवसभरात 24,506 टेस्ट करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 18 लाख 56 हजार 663 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वाचा: Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

राज्यातील कोरोनाची स्थिती

महाराष्ट्रात आज 67,123 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 419 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यातील 56,783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील आजपर्यंत एकूण 30,61,174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,35,80,913 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,70,707 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,72,584 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,623 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Published by: Sunil Desale
First published: April 17, 2021, 8:37 PM IST

ताज्या बातम्या