रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. रेमडेसिवीर औषधाच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. शिवाय एका यंत्रणेमार्फतच या औषधाचा पुरवठा केला जातो आहे.
2/ 14
रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या देशातील 7 प्रमुख औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.
3/ 14
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटरवर सातही कंपन्यांच्या रेमडेसिवीरच्या 100 mg कुपीचे आधीचे आणि नवे दर टाकले आहेत. त्यावर नजर टाकूयात.
4/ 14
Cadila Healthcare Limited कंपनी रेमडेसिवीर REDMAC नावाने विकते. ज्याची किंमत आधी 2800 रुपये होती. ती आता 899 रपये करण्यात आली आहे.
5/ 14
Syngene International Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर RemWin या नावाने आहे. 3950 रुपये किंमत असलेले हे औषध आता 2450 रुपयांना आहे.
6/ 14
Dr. Reddy's laboratories Ltd. कंपनीमार्फत हे औषध REDYX म्हणून दिलं जातं. ज्याची किंमत आधी 5400 आणि आता 2700 रुपये आहे.
7/ 14
Cipla Ltd.कंपनी CIPREMI नावाने रेमडेसिवीर औषध देते. या कंपनीने औषधाचे दर 4000 वरून 3000 रुपये केले आहेत.
8/ 14
Mylan Pharmaceuticals Pvt Ltd. कंपनी DESREM ब्रँडने रेमडेसिवीरचं उत्पादन घेतं. याची किंमत 4800 होती. आता ती कमी करून 3400 रुपये करण्यात आली आहे.
9/ 14
Jubilant Generics Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर JUBI-R म्हणून मिळतं. 4700 रुपयांचं हे औषध आता 3400 रुपयांना मिळेल.
10/ 14
Hetero Healthcare Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर COVIFOR ब्रँडने आहे. ज्याची किंमत 5400 वरून 3490 करण्यात आली आहे.
11/ 14
सरकारच्या गाइडलाइन्सनुसार हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाच दिलं जाईल.
12/ 14
सिप्ला कंपनी आपलं औषध थेट रुग्णालयातच पोहोचवत आहे. कंपनीची www.cipla.com या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती आहे. शिवाय मदतीसाठी 8657311088 हेल्पलाइन आणि info.availability@cipla.com हा ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.
13/ 14
तर डॉ. रेड्डीजच्या readytofightCovid.in या अधिकृत वेबसाईटवर हे औषध उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल्स आणि फार्मासिस्टची यादी आहे. तसंच 1800-266-708 हा हेल्पलाइनही जारी केला आहे.
14/ 14
महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा सर्वात जास्त तुटवडा आहे. त्यामुळे तिथं जिल्हाधिकारी आणि स्थानिक औषध निरीक्षकामार्फतच हे औषध पुरवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.