Home /News /crime /

5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; 65 वर्षीय व्यक्ती अटकेत

5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; 65 वर्षीय व्यक्ती अटकेत

65 वर्षीय व्यक्तीच्या कृत्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

    बगहा, 31 ऑक्टोबर : जिल्हाच्या सेमरा पोलीस ठाणे अंतर्गत एका ज्येष्ठाचं धक्कादायक कृत्य (Shocking News) समोर आलं आहे. 65 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती मुलीचा गैरफायदा घेत होता. यादरम्यान गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बांधलं आणि त्याला मारहाण केली. घटनेबद्दल सूचना सेमरा पोलीस ठाण्याला (Police Station) देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. ही घटना सेमरा पोलीस ठाणे हद्दीतील सिंगाडी गावातील आहे. (Attempted rape of a 5 year old girl with a Rs 5 coin 65 year old man arrested) मुलीला घरात घेऊन जाताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं, यानंतर गावकऱ्यांनी तातडीने मुलीच्या कुटुंबीयांना याची सूचना दिली. ज्यानंतर कुटुंबीय आरोपीच्या घरी मुलीचा शोध घेण्यासाठी पोहोचले. आरोपीने घराचं दार आतून बंद केलं होतं. आवाज दिल्यानंतरही जेव्हा आरोपीने दार उघडलं नाही, त्यानंतर गावकरी दार तोडून घरात शिरले. आणि मुलाला त्याच्यापासून वाचवलं. कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलीच्या हातात 5 रुपयाचं नाणं दिलं होतं आणि ती ओक्साबोस्शी रडत होती. हे ही वाचा-चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी या घटनेनंतर पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे. आरोपीचं वय सध्या गावात चर्चेचा विषय ठरला आहे. लोक आरोपीबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहे. सेमर पोलीस ठाण्याचे प्रमुख धीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की, प्रकरणाबद्दल माहिती मिळताच पोलिसांना पाठवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला तुरुंगात पाठवण्याची तयारी केली जात आहे. सांगितलं जात आहे की, 65 वर्षांचा हा ज्येष्ठाची दोन वेळा लग्न केलं आहे. आता त्याच्या दोन्ही पत्नी या जगात नाहीत. यापूर्वीदेखील दोन वेळा या प्रकारचं घृणास्पद काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं होतं. यादरम्यान तिला समजून सोडण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Rape

    पुढील बातम्या