पुणे, 29 जानेवारी : आतापर्यंत तुम्ही वडापावचे विविध प्रकार बघितले असतील आणि खाल्ले सुद्धा असतील. पण नेहमीच्या वडापाव पेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळा वडापाव खायचा असेल तर पुण्यामध्ये सध्या वडापाव मध्ये एक नवीन फ्युजन आलेला आहे. तो म्हणजे तंदूर वडापाव. तंदूर म्हटलं की आपल्यासमोर नेहमीच चिकन मटणाची नॉनव्हेज पदार्थ येतात. मात्र, हा चक्क व्हेज तंदूर वडापाव आहे.
कशी झाली सुरुवात?
शिवतीर्थ वडापावचे मालक प्रतीक इंदुलकर यांनी हा तंदूर वडापाव पहिल्यांदा सुरू केला आहे. प्रतीक इंदुलकर यांनी सांगितले, की सुरुवातीला मी एका हात गाडीवरती साधा वडापाव विकत होतो. पण मला वडापावमध्ये काहीतरी वेगळे इनोवेशन आणायचे होते. ज्यामुळे लोकांना वडापाव खाण्यात वेगळी चव मिळेल. त्यावेळेस माझ्या लक्षात आले की अनेक लोकांना तंदूर हा पदार्थ खायला आवडतो. तर त्यावरून मी तंदूर वडापाव सुरू केला.
कसा तयार केला जातो तंदूर वडापाव?
या वडापावसाठी लागणारे कोटिंगचं बेसन वेगळं वापरतो. या बेसनात आम्ही तंदूर मसाले घालतो. स्पेशल तंदूर मसाले आम्ही स्वतः बनवतो. वडापावचे सारण नॉर्मल वडापावच असतं. हा वडापाव आम्ही तळून झाल्यावरती त्याच्या पावाला तंदूरची चटणी मायोनीज टाकतो. आणि तंदूरच्या भट्टीमध्ये आम्ही बटर लावून हा वडापाव तंदूर करून ग्राहकांना देतो, असं प्रतीक इंदुलकर यांनी सांगितलं.
ग्राहकांच्या पसंतीचा वडापाव
गेल्या पाच वर्षापासून हा वडापाव आम्ही विकत असून ग्राहकांच्या पसंतीचा वडापाव आहे. या वडापावला अनेक ग्राहकांची चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सुरुवातीला कोथरूड येथे हा वडापाव सुरू केला होता. आता पुण्यामध्ये आमच्या दोन ठिकाणी या वडापावच्या शाखा आहेत, असंही प्रतीक इंदुलकर यांनी सांगितलं.
Chicken Vada Pav : मित्राचा ऐकला सल्ला आणि कोल्हापूरकरांना मिळाला 'लय भारी' पदार्थ, Video
तंदूरची चव या वडापावमध्ये चाखायला मिळते
मला नेहमीच्या वडापाव पेक्षा हा तंदूर वडापाव आवडला. याची चटणी अतिशय स्पेशल असून आपल्याला तंदूरची चव या वडापावमध्ये चाखायला मिळते. तसेच हे फ्युजन असल्यामुळे तुम्हाला वडापावच्या आतल्या तिखट सारणाची चव देखील चांगलीच जाणवते, असं ग्राहक संकेत नलावडे यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाल शिवतीर्थ वडापाव?
शॉप नंबर 4 देवयानीश्री अपार्टमेंट, पौड रोड, क्राउन बेकरी जवळ, अखिल शिवतीर्थ नगर कॉलनी, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411038
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local Food, Local18, Local18 food, Pune, Vadapav