मराठी बातम्या /बातम्या /पुणे /...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; पिंपरीत तलाठी पतीनं डॉक्टर पत्नीला निर्घृणपणे संपवलं

...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; पिंपरीत तलाठी पतीनं डॉक्टर पत्नीला निर्घृणपणे संपवलं

Murder in Pimpri: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं (Talathi Husband) आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या (Doctor wife brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder in Pimpri: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं (Talathi Husband) आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या (Doctor wife brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder in Pimpri: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं (Talathi Husband) आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या (Doctor wife brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी, 07 सप्टेंबर: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं (Talathi Husband) आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या (Doctor wife brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या पत्नीवर आधी चाकूनं हल्ला (Knife Attack) करून त्यानंतर हातोडीनं डोक्यात जबरी वार (Hit with Hammer) करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर घटनास्थळी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळली आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

सरला विजयकुमार साळवे असं खून झालेल्या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर विजयकुमार साळवे असं 35 वर्षीय आरोपीच नाव आहे. मृत सरला या पुण्यातील नायडू रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी पती विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगाव याठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत आहे. मृत सरला आणि विजय यांचा 2019 मध्ये प्रेम विवाह झाला होता. पण कालांतरागनं दोघांत खटकू लागलं यातूनचं आरोपी विजयनं सरला यांची निर्घृण हत्या केली आहे.

हेही वाचा-तरुणाने महिलेचं कापलं नाक, FB वर CM कडे न्यायाची मागणी करीत पीडितेची आत्महत्या

हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?

मयत सरला आणि तिचा आरोपी पती विजयकुमार यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी याठिकाणी एक फ्लॅट विकत घेतला होता. शनिवारी 4 सप्टेंबर रोजी या नवीन फ्लॅटची वास्तूशांती करण्यात आली होती. पूजा झाल्यानंतर सरला आणि विजयकुमार हे दोघंही तिथेच मुक्कामी थांबले होते. याठिकाणी विजयकुमारनं आपल्या पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर डोक्यात हातोडी मारून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपी पतीनं घटनास्थळी चिठ्ठी लिहून घटनास्थळावरून फरार झाला आहे.

हेही वाचा-निर्दय! पतीने बेशुद्ध करून तोंडात कोंबली LPG गॅसची पाईप, पत्नीचा तडफडून मृत्यू

दुसऱ्या दिवशी दोघांचेही मोबाइल बंद असल्याचं नातेवाईक आणि मित्रांच्या निदर्शनास आलं. काही जणांनी रविवारी दोघांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे साळवे यांच्या मित्रांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घराला बाहेरून कुलूप लावल्याचं पोलिसांना दिसलं. यानंतर पोलिसांनी चावीवाल्याकडून चावी तयार करून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात मृत सरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी सरला यांना त्वरीत पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीचं मृत घोषित केली.

हेही वाचा-स्कूटर घेऊन गेला अन् नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक शेवट

यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे. 'ती मला साथ देत नव्हती. त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा', अशा आशयचा मजकूर लिहिला होता. आरोपी विजयकुमार याला डॉ. सरला यांच्यावर चारित्र्याचा संशय होता. यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos