Home /News /maharashtra /

स्कूटर घेऊन गेला अन् 2 दिवसांनी नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक शेवट

स्कूटर घेऊन गेला अन् 2 दिवसांनी नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक शेवट

समेध तारक वाघमारे असं संबंधित 17 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

समेध तारक वाघमारे असं संबंधित 17 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

Crime in Yavatmal: शनिवारी स्कूटर घेऊन घराबाहेर पडलेला हा मुलगा परत घरी आलाच नाही. दोन दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीत त्याचा मृतदेह (Dead body found in River) आढळला आहे.

    वणी, 06 सप्टेंबर: यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजूर कॉलनी याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथे आपल्या काकांच्या घरी वास्तव्याला असणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शनिवारी स्कूटर घेऊन घराबाहेर पडलेला हा मुलगा परत घरी आलाच नाही. दोन दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीत त्याचा मृतदेह (Dead body found in River) आढळला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, समेध तारक वाघमारे असं संबंधित 17 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणानिमित्त तो आपल्या काकांच्या घरी राजूर कॉलनी येथे राहत होता. दरम्यान शनिवारी समेधनं बाहेर जायचं असल्याचं सांगत घरातून स्कूटरची चावी घेतली आणि घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी तो परत घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांची देखील चिंता वाढली. हेही वाचा-जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील त्यांनी समेधचा अनेक सर्वत्र शोध घेतला. कुटुंबीयांना, जवळच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवारकडे चौकशी केली, पण त्याचा काही थांगपत्ता सापडला नाही. दरम्यान रविवारी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर त्याची दुचाकी आढळून आली. यानंतर समेधनं आत्महत्या केली असावी, असा संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली. हेही वाचा-निर्दय! पतीने बेशुद्ध करून तोंडात कोंबली LPG गॅसची पाईप, पत्नीचा तडफडून मृत्यू दरम्यान सोमवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा गावाजवळील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. सुमेधनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं असावं, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. वणी पोलीस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Suicide, Yavatmal

    पुढील बातम्या