हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार

हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार

तबलिगी जमातच्या प्रचार-प्रसारासाठी दिल्लीतील निजामुद्दीनहून पुणे जिल्ह्यात आलेले 10 जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

शिरुर, 3 एप्रिल: तबलिगी जमातच्या प्रचार-प्रसारासाठी दिल्लीतील निजामुद्दीनहून पुणे जिल्ह्यात आलेले 10 जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सगळ्यांच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का मारलेला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून तबलिगी जमातचे 10 जण पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले आहे. महिनाभरापूर्वी हे सगळे दिल्ली येथून शिरूर येथे आले होते. परंतु देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे सर्व नागरिक शिरूर शहरात अडकले होते. त्यांनी होमक्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, गुरुवारी रात्री एका मालवाहतूक ट्रकमध्ये बसून ते शिरूरहून दिल्लीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आला आहे.

हेही वाचा...तबलिगी समाजातील कोरोना रुग्णांचा कहर, नर्ससमोरच बदलले कपडे

धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्लीला गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागन झाल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे त्याच कार्यक्रमाच्या प्रसारासाठी शिरूरमध्ये आलेले 10 जण पळून गेलेच कसे? असा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या सर्वांवरती आता शिरूर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम 188, 269, 271 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब), मोटर वाहन कायदा कलम 66(1), 192 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...सलाम! दगडफेकीत जखमी होऊनही महिला डॉक्टर दुसऱ्याच दिवशी परतल्या ड्यूटीवर

निजामुद्दीन देशभर पसरला कोरोना

दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे तबलिगी जमात कार्यक्रमानंतर देशात हजारो कोरोना प्रकरणे नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 400 कोरोना-संक्रमित लोक सापडले आहेत. निजामुद्दीन मरकझ येथून 2 ते 3 हजार लोकांना हलविण्यात आले आहे. बऱ्याच राज्यांत पसरलेल्या जमातमधील लोकांना वेगवेगळ्या राज्यातील रुग्णालयात दाखल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2020 05:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading