'आम्हाला सुखरूप घरी परतण्यासाठी मदत करा' हा VIDEO पाहून सुप्रिया सुळेंनी केलं पुण्याच्या पोलिसांचं कौतुक

'आम्हाला सुखरूप घरी परतण्यासाठी मदत करा' हा VIDEO पाहून सुप्रिया सुळेंनी केलं पुण्याच्या पोलिसांचं कौतुक

हा व्हिडिओ अतिशय परिणामकारक आहे‌.अवश्य पाहा, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे आणि पुणे पोलिसांच्या सक्षमतेचं कौतुकही केलं आहे.

  • Share this:

पुणे, 31 मार्च : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोशल मीडिया अकाउंटवरून पुणे पोलिसांचा एक VIDEO शेअर केला आहे. हा व्हिडीओ अतिशय परिणामकारक आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांचं कौतुकही केलं आहे. Coronavirus मुळे उद्भवलेली परिस्थिती पुणे पोलीस सक्षमपणे हाताळत आहेत, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहनही त्या करतात.

'आम्हाला सुखरूप घरी परतण्यासाठी मदत करा', असं भावुक आवाहन करणाऱ्या पोलिसांनी अत्यंत परिणामकारकरीत्या पुणेकरांना घरी राहा, हा संदेश दिला आहे. माझी आई घरी आजारी आहे, असं म्हणणारा पोलीस यात दिसतो. माझी 3 वर्षांची मुलगी घरी आहे, असं सांगणारी महिला कर्मचारीही दिसते. माझी बायको घरी काळजी करते, असं ट्रॅफिक हवालदार सांगतो. तुम्ही घरी राहिलात तर आयुष्य वाचेल, पुणं वाचेल, असं सांगत पुणे पोलिसांनी या व्हीडिओतून कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी घरी बसा, असं आवाहन केलं आहे.

वाचा - ‘कोरोना’मुळे दररोजच्या जगण्यातल्या या दोन गोष्टी होऊ शकतात हद्दपार

या व्हिडीओचं कौतुक करत खासदार सुप्रिया सुळे यांनी तो त्यांच्या Twitter अकाउंटवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ परिणामकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांना सहकार्य करा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'पुणे पोलीस कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहेत.याबाबत त्यांनी तयार केलेला हा व्हिडिओ अतिशय परिणामकारक आहे‌.अवश्य पहा. आपली काळजी घ्या, पोलीसांना सहकार्य करा."

पुणे पोलिसांनीही लगेच या ट्वीटची दखल घेत सुळे यांचे आभार मानले आहेत.

निजामुद्दीन परिषदेतील 441 लोकांमध्ये Coronavirus ची लक्षणं; 2000 जण क्वारंटाइन

First published: March 31, 2020, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading