पुणे, 5 फेब्रुवारी : दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1-1 खासदाराचा समावेश आहे. यातल्या महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटींची वाढ झाल्याचं या अहवालाक नमूद करण्यात आलं आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीमध्ये 20 कोटींची, प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीत 10 कोटींची, भावना गवळी यांच्या संपत्तीत 6 कोटींची वाढ झाल्याचा अहवाल समोर आला आहे. कोणाच्या संपत्तीमध्ये किती वाढ? सुप्रिया सुळे- 89 कोटींची वाढ रावसाहेब दानवे- 20 कोटींची वाढ प्रतापराव जाधव- 10 कोटींची वाढ भावना गवळी- 6 कोटींची वाढ दरम्यान आपल्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. माझ्या संपत्तीची कागदपत्रं तपासून पाहा. ही माहिती खोटी असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने हा अहवाल दिला आहे. 2009 आणि 2019 दरम्यान पुन्हा निवडून आलेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत 286 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही माहिती मिळवल्याचा दावा संस्थेने केला आहे. या अहवालानुसार देशातल्या खासदारांमध्ये सर्वाधिक संपत्ती शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या खासदार हरसीमरत कौर बादल यांची वाढली आहे. बादल यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 157 कोटींची वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







