• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • राज ठाकरेंचा असाही मोठेपणा, यापुढे शाखाध्यक्षांच्या घरी जाणार जेवायला!

राज ठाकरेंचा असाही मोठेपणा, यापुढे शाखाध्यक्षांच्या घरी जाणार जेवायला!

आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेतील प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द होऊन याऐवजी शाखाध्यक्षपदाला महत्व प्राप्त होणार आहे. 

  • Share this:
पुणे, 19 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) नाशिक पाठोपाठ आता पुणे (pune) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.  पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यापुढे शाखा अध्यक्षाच्या (MNS branch president)  घरी जेवायला जाणं पसंत करणार आहेत, नव्हे तशी घोषणाच त्यांनी आजच्या पदाधिकारी बैठकीत करून टाकली आहे. आगामी वर्षातील पुणे मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी मनसे नेते, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटक, शाखाध्यक्ष अशा तब्बल 40 पक्ष पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधला आणि त्यांना थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले. तसंच आजच्या पुणे शहर बैठकीत प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द करून वार्डनिहाय शाखाध्यक्ष नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर मनसेला तब्बल 181 शाखाध्यक्ष मिळतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली.
या तीन दौऱ्यात राज ठाकरे खरंतर मतदारसंघ निहाय चार मेळावे घेणार होते पण त्यात ऐनवेळा बदल करून फक्त दोन बैठका घेतल्या जात आहेत. त्यातली पहिली बैठक आज सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये पार पडली तर दुसरी बैठक उद्या कोंढवा भागात होणार आहे. मनसेत आतापर्यंत प्रभाग अध्यक्ष वार्डस्तरीय महत्वाचं पद मानलं जायचं पण आगामी पुणे मनपा निवडणूक प्रभागाऐवजी वार्डस्तरावरच होण्याची शक्यता अधिक आहे. फारतर दोन वार्डांचा मिळून एक प्रभाग असणार असल्याचे सुतोवाच शासन पातळीवरून दिले जाताहेत म्हणूनच कदाचित मनसेनं प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द करून त्याऐवजी शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्ष नियुक्त करण्याची रणनिती आखल्याचं बोललं जातंय. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षपदावर जास्त फोकस ठेवला होता. तसंच यापुढे 'मी थेट तुमच्या घरी जेवायला येत जाईल', अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे शाखाध्यक्षांमध्ये नवाच नवा उत्साह संचारल्याचं बघायला मिळालं. बसमध्ये सीटवर बसू दिले नाही, मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण, VIDEO याच बैठकीत राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'यापूर्वी सरकारला वाटायचं की दुष्काळ हवा, पण आताच्या सरकारला वाटत. लॉकडाऊन हवा वाटतं, तुम्हाला काम करून द्यायचे नाही. कायम तुम्हाला लॉकडाऊनमध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे या मानसिकतेतून आपण बाहेर पडून, जनतेच्या प्रश्नावर लढले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी कामास सुरूवात करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.
Published by:sachin Salve
First published: