मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट; मग या कामासाठी करायचे वापर, मुंबईतील टोळीचा पर्दाफाश

रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट; मग या कामासाठी करायचे वापर, मुंबईतील टोळीचा पर्दाफाश

Crime in Mumbai: मुंबईतील गोरेगावच्या आरे पोलिसांनी रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत चार चोरट्यांना अटक (4 theft arrested) केली आहे.

Crime in Mumbai: मुंबईतील गोरेगावच्या आरे पोलिसांनी रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत चार चोरट्यांना अटक (4 theft arrested) केली आहे.

Crime in Mumbai: मुंबईतील गोरेगावच्या आरे पोलिसांनी रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत चार चोरट्यांना अटक (4 theft arrested) केली आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) गोरेगावच्या आरे पोलिसांनी रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत चार चोरट्यांना अटक (4 Rickshaw theft arrested) केली आहे. संबंधित चोरटे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरायचे. संबंधित रिक्षाची नंबर प्लेट बदलून पाच हजार रुपयांना विकायचे. तर काही रिक्षा चालकांना चोरीची रिक्षा भाडेतत्त्वावर द्यायचे. चोरीचा रिक्षा भाड्यानं देत आरोपी दररोज तीनशे रुपयांची कमाई करत होते. पोलिसांनी या रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आरे पोलिसांनी नालासोपारा, अंधेरी, गोरेगाव परिसरातून 6 रिक्षा जप्त केल्या आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

समद शब्बीर शेख (24), सुफियान इम्रान खान (25) रफिक रहमान खान (30) आमिर शरीफ भट (24) अशी अटक केलेल्या रिक्षा चोरांची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपींना आरे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पवई आणि अन्य भागातून अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरीची तक्रार प्राप्त झाली होती.

हेही वाचा-मुंबई: कामगारानं घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं अन्...

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरे पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पवई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे चार चोरट्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी चार आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच अशाप्रकारे मुंबई शहरात एकूण सहा रिक्षा चोरल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. संबंधित सर्व आरोपी मुंबईतील विविध भागातून ऑटो रिक्षा चोरायचे. त्यानंतर रिक्षाची नंबर प्लेट बदलून 5 हजारांना विकायचे.

हेही वाचा-सातारा हादरलं! आधी झोपेतून उठवलं मग..; सख्खा भावाला मध्यरात्री दिला भयंकर मृत्यू

चोरीची ऑटोरिक्षा खरेदी करणारी व्यक्ती ऑटोरिक्षाला भाडं म्हणून आरोपींना दररोज तीनशे रुपये द्यायचे. याप्रकरणी आरे पोलिसांनी समद शब्बीर शेख (24), सुफियान इम्रान खान (25) रफिक रहमान खान (30) आणि आमिर शरीफ भट (24) अशा चार आरोपींना अटक केली आहे. चारही आरोपी पवई परिसरातील रहिवासी आहे. यामध्ये सुफियान हा सराईत गुन्हेगार असून तो चेन स्नॅचिंगचा मास्टर माइंड आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास आरे पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai