Home /News /pune /

विचित्र अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार! दुभाजक ओलांडून थेट घरात घुसला टेम्पो

विचित्र अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार! दुभाजक ओलांडून थेट घरात घुसला टेम्पो

या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

    सुमीत सोनवणे (प्रतिनिधी) दौंड, 5 सप्टेंबर: पुणे-सोलापूर महामार्गावरील भरधाव टेम्पोनं दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकीला चिरडून थेट घरात घुसला. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मृत व्यक्ती पुणे पोलिस कर्मचारी होती. दौंड तालुक्यातील वरवंडजवळ कौठडीचा मळा येथे हा भीषण अपघात झाला. हेही वाचा...पुण्यात कोरोनाबाबत कुठं चुकतेय रणनीती? शरद पवारांनी लावला बैठकांचा सपाटा माल वाहतूक करणारा टेम्पो दुचाकीला चिरडून थेट रस्तालगतच्या घरात घुसला. या अपघातात दौंडमध्ये राहणारा पुणे शहर पोलीस कर्मचारी शंकर नाना डोईजड यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांची पत्नी संगीता डोईजड या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर वरंवड जवळ कोठीचा मळा येथे शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये माल वाहतूक टेम्पो (एमएच.12.एफ झेड. 3963) भरधाव वेगानं सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी वरवंडजवळ कोठीचा मळा येथे टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटून महामार्गावरील दुभाजक ओलांडून पुण्याकडून पाटसच्या दिशेकडे जाणारी दुचाकीला (एमएच.42,ए. झेड,7480) चिरडून पुढे रस्तापासून काही अंतरावर असललेल्या घराला धडकला. या धडकेत घरातील भिंत कोसळली. सुदैवाने या घरात 8 महिन्यांच्या बाळासह सहाजण बचावले. मात्र या अपघातात घराचं मोठं नुकसान झालं आहे. वाहन चालकाच्या चुकीमुळे पुणे शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. त्यामुळे पोलिसांनी या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा...मनसे नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर केली टीका, पाहा हा VIDEO दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंडजवळ टाटा इंडीको गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यु झाला होता. या अपघात स्थळापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावरच ह रात्रीचा अपघात झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर वरवंड हद्दीतमध्येच एका आठवड्यात अपघात होण्याची ही दुसरी घटना घडली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Pune accident

    पुढील बातम्या