मराठी बातम्या /बातम्या /पुणे /ST Employees Strike: 'सर्वांचेच सामूहिक निलंबन करा' संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचं परिवहन मंत्री अनिल परबांना पत्र

ST Employees Strike: 'सर्वांचेच सामूहिक निलंबन करा' संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचं परिवहन मंत्री अनिल परबांना पत्र

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संपही सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीच.

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संपही सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीच.

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संपही सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीच.

  पुणे, 12 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employees strike) आजही सुरुच आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. आंदोलनावर कुठलाही तोडगा निघत नाहीये आणि त्यातच महामंडळाकडून राज्यातील विविध विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचं दररोज निलंबन (ST workers suspension) करण्यात येत आहे. महामंडळाकडून सुरु असलेल्या या कारवाईनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांना पत्र लिहून सर्वच कर्मचाऱ्यांचे सामूहिक निलंबन करण्याची मागणी केली आहे.

  आपल्या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं, "आम्ही स्वारगेट आगार पुणे येथील सर्व कर्मचारी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शसानात विलगीकरण करणेसाठी राज्यातील इतर सर्व आगारातील व इतर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी आहोत. तरी या संपूर्ण आंदोलनात आम्ही सर्व कामगारांनी एकमताने व सहमताने कामबंद / संप आंदोलन केले आहे. सदर आंदोलनामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा तेवढाच व पुर्ण सहभाग व सदर कामबंद संपास आम्हीही तेवढेच जबाबदार असून जर आपल्याकडून निलंबनाची कार्यवाही होत असेल तर ही कार्यवाही आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे करण्यात यावी."

  आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. जर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक दबावामध्ये स्वत:च्या जीवाचे काही बरे वाईट करुन घेतले तर त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असंही एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

  वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन

  कर्मचाऱ्यांचे कुटुंबही उतरणार रस्त्यावर

  एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता चिघळत असल्याचं दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबतच आता त्यांचे कुटुंबीयही संपात सहभागी होऊन रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

  एसटी महामंडळाकडून शिवनेरी बससेवा सुरू

  एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाकडून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. कंडक्टर संपावर असल्याने अधिकारीच बुकिंग करत आहेत. कंत्राटी चालकांना घेऊन शिवनेरी बससेवा सुरू करणअयात आली आहे. पुण्याहून मुंबईसाठी या शिवनेरी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घ्या आणि सहकार्य करण्याचं म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका असंही विरोधकांना म्हटलं आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

  मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

  First published:
  top videos

   Tags: Anil parab, ST, Strike