• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अतिवृष्टीने हाता-तोंडाला आलेला घास हिरावला; बीडमध्ये दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं

अतिवृष्टीने हाता-तोंडाला आलेला घास हिरावला; बीडमध्ये दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं

Suicide in Beed: बीडमधून हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून संबंधित शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं (2 farmers commits suicide in beed) आहे.

 • Share this:
  बीड, 02 ऑक्टोबर: मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान (Heavy rainfall in maharashtra) घातलं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पिकासह खरडून वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं (farmer suffered heavy loss) आहे. हाता तोंडाला आलेलं पीक अस्मानी संकटानं हिरावून नेल्यानं अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अशात बीडमधून हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून संबंधित शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं (2 farmers commits suicide in beed) आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय-55) आणि योगेश वसंत खांडवे (वय-24) असं आत्महत्या करण्याऱ्या दोन शेतकऱ्यांची नावं आहेत. मृत भाऊसाहेब पांढरे हे गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रहिवासी असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. भाऊसाहेब यांनी घर बांधणीसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. याशिवाय सेंट्रल बँकेतून पीककर्ज देखील घेतलं होतं. या दोन्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी पांढरे यांनी आपल्या शेतात कापूस आणि सोयाबीनची लागवड केली होती. हेही वाचा-पुणे: पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड पण अलीकडेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कोसळलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे पांढरे यांची पिकासह शेती खरडून वाहून गेली. यामुळे त्याचं अतोनात नुकसान झालं. याच नैराश्यात पांढरे यांनी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या घराजवळील एका झाडाला गळपास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच पांढरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा-आता कायमचं जग सोडतो! Whatsapp स्टेटस ठेवून तरुण गायब, पोलिसांकडून रात्रभर शोध तर दुसऱ्या एका घटनेत, बँकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून योगेश वसंत खांडवे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. खांडवे यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी वडवणी तालुक्यातील धानोरा याठिकाणी उघडकीस आली आहे. गावातील एका तरुण शेतकऱ्याचा अशाप्रकारे झालेला अंत पाहून गावात शोककळा पसरली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: