पुणे, 10 जून: पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात विमान नगरातील संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली आहे. आरोपींकडे सुमारे 10 कोटी रुपयांचा रोकड सापडली आहे. त्यात 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रकमेचा समावेश आहे. रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीकडे परदेशी चलन आणि बनावट पिस्तूलही सापडलं आहे. हेही वाचा… पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी पुणे क्राईम ब्रॅंचच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आरोपी डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.