पुणे, 20 एप्रिल: श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे (Shrimant Mahendra Peshwa) यांचं पुण्यात निधन झालं आहे. महेंद्र पेशवे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
श्रीमंत महेंद्र पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज होते. त्यांचं पुणे शहरातच वास्तव्य होतं. तसंच महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणत स्थापन करण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना महेंद्र पेशवे यांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झालं आहे.
हेही वाचा - संचारबंदीमुळे पुण्याहून गावी निघाले दोघे भाऊ; मात्र काळाने घातला घाला
दरम्यान, राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली असून सुविधांअभावी होणाऱ्या मृत्यूसंख्येतही वाढ होऊ लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Death, Maharashtra, Mumbai, Pune