• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • इंजेक्शन देत बेशुद्ध करुन गुरांची चोरी, लोणावळ्यातील धक्कादायक घटनेचा CCTV

इंजेक्शन देत बेशुद्ध करुन गुरांची चोरी, लोणावळ्यातील धक्कादायक घटनेचा CCTV

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे गाई चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 • Share this:
  गणेश दुडम, प्रतिनिधी  लोणावळा, 3 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यात (Pune District) गाई, वासरांची चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याच दरम्यान आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच अचंबित केले आहे. गाईंना चक्क बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन मग त्यांची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात (Lonavala) उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Caught in CCTV) झाली आहे. (Cows stealing by giving euthanasia injections) लोणावळा शहरात रात्रीच्या वेळी गाई, वासरांना बेशुद्ध करून पळवुन नेण्याचा प्रकार पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे हा प्रकार घडला आहे. भटक्या गाईंना बेशुद्ध करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. धावत्या रिक्षात निघाला भलामोठा साप अन्...; दिवसभर काबाडकष्ट केलेल्या मजूराचा दुर्दैवी अंत मध्यरात्री साखर झोपेत असताना या मुक्या जनावरांना काही तरुणांनी पाव खायला टाकले आणि पटकन भुलीचे इंजेक्शन देऊन गाई वासरांना बेशुद्ध केल्यावर चार चाकी गाड्यांमध्ये भरुन नेण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावे असं निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ,आणि वारकरी संप्रादय हिंदू समिती लोणावळा यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. लोणावळ्यात भररस्त्यात असा प्रकरा घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान अशा प्रकारे गुरांची चोरी होण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: