पुणे, 21 जुलै: गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यांत (Pune District) अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरातील एटीएममध्ये दोन दिवसांपूर्वी एक स्फोट झाला होता तर आज चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरातील एटीएममध्ये स्फोट (Explosion in ATM) झाल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान आता सूत्रांकडून एक धक्कादायक माहिती समोर आली असून यात नक्षली कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण आणि रांजणगाव या दोन्ही ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. या दोन्ही ठिकाणी आरोपींची मॉडस ऑपरेंडी ही एकसारखीच असल्याचं लक्षात येत आहे. ज्या प्रकारी हे स्फोट घडवून आणले आहेत ते पाहता यात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
इतकेच नाही तर हा स्फोट घडवण्यासाठी आयईडी इंप्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसेसचा व्पर केला असल्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खळबळजनक! दोन दिवसांत 2 ATM सेंटरमध्ये स्फोट; रांजणगाव एमआयडीसी घटनेचा CCTV आला समोर
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मध्ये असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरामध्ये स्फोटकं लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्फोट घडवून चोरटे पैसे घेऊन पसार झाले आहेत. तर या स्फोटात एटीएम खोली दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून पडले, त्यामुळे हा स्पोट किती भीषण होता याचा अंदाज येत आहे.
मिळालेल्या हितीनुसार, पुण्यामधील चाकण एमआयडीसी परिसरामधील भांबोली गावात हिताची कंपनीचे एटीएम आहे.
मध्यरात्री 1 च्या सुमारास या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज पोलिसांनकडून वर्तवला जात आहे. तर या स्फोटामध्ये एटीएम ATM मशिनचा अर्धा भाग फुटला असून, सुमारे 6 ते 7 लाख रुपये रक्कम चोरट्यांनी लांपास केली आहे. यादरम्यान, स्फोटाचे नेमकं काय कारण शोधण्यासाठी डॉग पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले. तर पुढील तपास बॉम्ब शोधक आणि पोलीस प्रशासन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Pimpri chinchawad, Pune