पुणे, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. शहरी भागात कोरोनाची रुग्ण संख्या वाढली असताना ग्रामीण भागातूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील तीन दिवसांमध्ये ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण 500 हून अधिक आढळून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण पसरले आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहे. पूर्वी दिवसाला 3 हजार चाचण्या होत होत्या. पण, आता याच चाचण्याची क्षमताही 5 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ठिकठिकाणी 79 कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बातमी, ठाकरे सरकारने कोरोना चाचणीबद्दल काढला नवा आदेश
तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या ही 40 हजारांवर पोहोचली आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 1 लाख 47 हजार 674 एवढे रुग्ण आढळले आहेत, यापैकी 1 लाख 500 रुग्ण बरे झाले आहेत, तर 43 हजार 497 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3674 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्क्यांवर
दरम्यान, राज्यात 21 ऑगस्टपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 9 हजार 241 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार 114 रुग्ण बरे झाले आहेत. आज 14 हजार 492 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 69 हजार 516 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
देशात दिवसाला 70 हजार रुग्णांची वाढ
तर ऑगस्ट महिन्यात देशात कोरोनाचा संसर्गाचा वेग वाढला असून दिवसाला साधारण 70 हजाराच्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.
कृषी खाते काय झोपले आहे का? बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला घरचा अहेर, पाहा हा VIDEO
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या दिवशी देखील 69 हजार, 239 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखहून अधिक झाली आहे.
16 दिवसांमध्ये 10 लाख रुग्ण वाढले आहेत. भारतात 7 लाख रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 912 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूचा आकडा 56 हजार 706 वर पोहोचला आहे.