मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

तब्बल 400 कोटींचा घोटाळा करणाऱ्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द

तब्बल 400 कोटींचा घोटाळा करणाऱ्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द

न्यूज18 लोकमतनेच शिवाजीराव भोसले बँक घोटाळा उघडकीस आणून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.

न्यूज18 लोकमतनेच शिवाजीराव भोसले बँक घोटाळा उघडकीस आणून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.

न्यूज18 लोकमतनेच शिवाजीराव भोसले बँक घोटाळा उघडकीस आणून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.

पुणे, 31 मे :  अखेर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने आज दिला आहे. न्यूज18 लोकमतनेच शिवाजीराव भोसले बँक घोटाळा उघडकीस आणून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. या घोटाळ्यात आमदार अनिल भोसले यांना अटक झाली होती ते आजही तुरूगांत आहेत. त्यांची प्रॉपर्टीदेखील जप्त झाली आहे. या बँक घोटाळ्यात शिवाजी भोसले बँकेने मोठी रक्कम थकवली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने तब्बल 400 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. (Shivajirao Bhosale Co operative Banks license cancelled) आमदार अनिल भोसले व इतर लोक आहेत अटकेत आहेत. बँकेचं लायसन रद्द झाल्याने ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान 5 लाख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे ही वाचा-मोठी बातमी : बारामती जिल्हा परिषद सदस्येच्या पतीवर गोळीबार, परिसरात खळबळ काय आहे प्रकरणं भारतीय रिझर्व्ह बँकने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते अशा एकूण 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी आमदार अनिल भोसलेंना अटकही झाली आहे. एवढंच नाही तर त्यांच्या 3 आलिशान गाड्याही जप्त केल्या गेल्यात. भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा असून, 95 हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. न्यूज18 लोकमतनेच हा सर्व घोटाळा उघडकीस आणला होता.
First published:

Tags: Bank, License, Pune

पुढील बातम्या