पुणे, 14 जुलै: पुण्यात एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (One sided love) आपल्याच नात्यातील एका विवाहित महिलेचा छळ (Married woman molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं नातेवाईक असणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीनं मिठी मारून (Forcibly hug) तिचे फोटो काढले (Click Photos) आहेत. एवढंचं नव्हे तर, आरोपीनं हे फोटो पीडितेच्या नवऱ्याला आणि अन्य नातेवाईकांना देखील पाठवले (Sent to husband and relative) आहेत. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मारुती विठ्ठल येरदे असं गुन्हा दाखल झालेल्या 21 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी तरुण हा फिर्यादी महिलेचा नातलग आहे. त्याचं पीडितेच्या घरी नेहमी येणं जाणं असतं. याशिवाय पीडित महिला कामाला जात असताना, संबंधित तरुण नेहमी तिचा पाठलाग करत असे. तसेच काही वेळा तो पीडितेच्या घरी राहायला देखील आला आहे.
हेही वाचा-विवाहबाह्य संबंधामुळे महिलेला गावकऱ्यांसमोर दिली ही शिक्षा; भयानक व्हिडीओ VIRAL
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पीडितेच्या घरी वास्तव्याला असताना, त्यानं अनेकदा फिर्यादी महिलेशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पीडिता घरात एकटी असताना तिला जबरदस्तीनं मिठी मारण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पीडित महिला घरात झोपलेली असताना, आरोपीनं झोपेत तिचे अनेक फोटो देखील काढले आहेत. त्याचबरोबर या फोटोंवर अश्लील मजकूर लिहित तरुणानं हे फोटो पीडित महिलेच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा-मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेट महिला एजंटला अटक
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मारुती येरदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच लवकरच आरोपीला गजाआड करण्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Sexual harassment