पुणे, 13 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनला (Corona lockdown) प्रत्येक जण वैतागला आहे. अशात आता कोरोना उत्पादकांनीही लॉकडाऊनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum institute of india) अध्यक्ष सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी लॉकडाऊन नको, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. याचं कारणही त्यांनी दिलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस सध्या देशभरात दिली जात आहे. या कंपनीच्या अध्यक्षांनी लॉकडाऊनबाबत आपलं मत मांडलं आहे. हर्ड इम्युनिटी तयार होईल, त्यामुळे लॉकडाऊन नको, असं त्यांनी म्हटलं आहे. मृत्यू दर आता कमी आहे. 50 टक्के लोक तर अज्ञान, अंधश्रद्धेपोटी मृत्यूमुखी पडलेत, असं ते म्हणाले. तसंच मृत्यूदर जास्त असेल तरच लॉकडाऊन करा, असंही पूनावाला यांनी सांगितलं.
हे वाचा - मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ...तोपर्यंत हटणार नाहीत मुंबईतले कोरोना निर्बंध!
लॉकडाऊन नको असं जरी पूनावाला यांनी सांगितलं असलं तरी मुलांसाठी शाळा सुरू करण्याला मात्र त्यांनी विरोधच दर्शवला आहे.
लहान मुलांना घरूनच अभ्यास करू दे. लहान मुलांची लस यायला बराच वेळ लागणार. मुलांना एक- दोन वर्ष घरी बसूनच शिकू द्या, असंही ते म्हणालेत. 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी कोवशिल्डची परवानगी घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नोवोवॅक्स लस 12 वर्षांच्या वरील मुलांना देता येईल, असं त्यांनी सांगितलं.
हे वाचा - 'Mixing vaccine नको कारण...', Cyrus Poonawalla यांनी सांगितला कॉकटेल लशीचा सर्वात मोठा धोका
आज पुण्यात डॉ. सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरण, लॉकडाऊनबाबत आपली भूमिका मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown