मुंबई, 13 ऑगस्ट : मुंबईतले (Mumbai) कोरोनासाठीचे सर्वच्या सर्व निर्बंध (corona restrictions) कधी हटणार, याचं उत्तर मुंबई महापालिका आयुक्तांनी (BMC Commissioner) दिलं आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण जेव्हा पूर्ण (100% vaccination) होईल, तेव्हा हे निर्बंध हटवण्यात येतील. सर्वांचं लसीकरण नोव्हेंबर महिनाअखेर पूर्ण होईल, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबान सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केला आहे.
Very important commentary coming in from @mybmc commissioner @IqbalSinghChah2, says will remove all restrictions in Mumbai if entire population is vaccinated pic.twitter.com/cel3jKBQUN
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) August 13, 2021
लसीकरणाची गती महत्त्वाची
मुंबईत सध्या लसीकरणाचा वेग चांगला असला तरी लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेकदा लसीकरण केंद्रं बंद ठेवावी लागत असल्याचं चित्र आहे. मात्र लवकरच लसींचा पुरवठा वाढेल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरू आहे, ते पाहता या दिवाळीपर्यंत जवळपास 100 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हळूहळू अनलॉक
मुंबईतील बाजारपेठा आणि इतर व्यवहार हळूहळू सुरु करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि नियोजनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची आकडेवारी नियंत्रणात असली, तरी हळूहळू निर्बंध उठवण्यात येत आहेत.
हे वाचा -मोठी बातमी: कोणत्याही क्षणी परमबीर सिंह यांना होऊ शकते अटक
मुंबई लोकलची प्रतिक्षा
15 ऑगस्टपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असली, तरी केवळ लसींचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याचाच अर्थ बहुतांश नागरिकांना अद्यापही या सुविधेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे मुंबईत पूर्वीसारखे सर्व व्यवहार कधी सुरू होतात आणि मुख्य म्हणजे कुठल्याही अटींविना मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होते, याकडं सर्वाचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid cases, Mumbai, Vaccinated for covid 19