मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Covishield आणखी स्वस्त; Serum institute ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

Covishield आणखी स्वस्त; Serum institute ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) कोविशिल्ड (covishield) कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) कोविशिल्ड (covishield) कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) कोविशिल्ड (covishield) कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे.

  • Published by:  Priya Lad

पुणे, 28 एप्रिल :  भारतातील कोविशिल्ड (covishield) कोरोना लस आणखी स्वस्त झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) कोरोना लशीची किंमत (covishield price) आणखी कमी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीरमचे सीईओ आदर पूनावाला (Adar poonawalla) यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे.

कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य सरकारसाठी सीरमने आपले दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता 400 ऐवजी 300 रुपयांना दिली जाणार आहे. म्हणजे 100 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांच्या दराबाबत मात्र सीरमने अद्याप काही निर्णय घेतलेला नाही.

सीरमचे सीईओ आदर पूनावाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे, "राज्य सरकारसाठी कोरोना लशीची किंमत प्रति डोस 400 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आल आहे. ही किंमत तात्काळ लागू आहे. यामुळे राज्य सरकारचा हजारो कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होईल आणि अनेकांचा जीव वाचेल", असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

हे वाचा - 617 कोरोना व्हेरिएंट्सवर भारी COVAXIN; भारतीय कोरोना लशीबाबत अमेरिकन तज्ज्ञांचा मोठा दावा

मोदी सरकारला ही लस प्रति डोस 150 रुपयांना देण्यात आली होती. त्यामुळे राज्य सरकारसाठी आणि 18+ नागरिकांचं लसीकरण सुरू होत असताना सर्वसामान्यांसाठी या लशीची किंमत का वाढवण्यात आली असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात आला होता.

CNBC TV18 शी याबाबत बोलताना सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं,  "सर्वात आधी आपण कोरोना लशीची किंमत 1000 रुपये ठरवली होती. तीसुद्धा जास्त नव्हती. पण तरी आम्ही 150 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही राज्यांकडून 1000 रुपये कोरोना लशीसाठी प्रस्तावही आला. त्यांनी आम्हाला अनुदानही देऊ केलं. पण आम्ही ते नाकारलं कारण आम्हाला केंद्र सरकारकडून तशी परवानगी नाही. कोरोना लशीची किंमत ठरवण्याआधी आम्ही काही राज्य सरकारशी बोललो. आम्ही 600 रुपये किंमत ठरवली होती. पण राज्यांशी बोलल्यानंतर राज्य सरकारसाठी 400 रुपये किंमत केली"

हे वाचा - 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

पूनावाला पुढे म्हणाले, "150 रुपये किमतीने कोरोना लस देऊन खरंतर आम्ही तोट्यात आहोत.  या लशीबाबत अॅस्ट्राझेनेका कंपनीशी करार केलेला असल्याने आम्हाला त्यांना नफ्याचा 50% भाग द्यावा लागतो. केंद्र सरकारला आम्ही आधीच 9 ते 10 कोटी डोस दिले आहेत. दुसऱ्या करारानुसार आम्ही 110 दशलक्ष डोस देणार आहोत. हे डोससुद्धा 150 रुपये किमतीनुसारच देणार आहोत. कारण नव्या कोरोना लसीकरण मोहिमेआधी हा करार झाला आहे"

आता मात्र सर्व सरकारसाठी कोरोना लशीची किंमत सारखीच असेल, असंही पूनावाला म्हणाले होते. शिवाय इतर देशांच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त आहे. अमेरिकेतील कोरोना लशीचा एक डोस 1500, तर रशिया आणि चीनमधील कोरोना लशीचा एक डोस 750 रुपयांना आहे. त्या तुलनेत भारतातील कोरोना लस खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

हे वाचा - मोठी बातमी! 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही

कोविशिल्डप्रमाणे भारतात हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसही दिली जाते आहे. कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये आहे. कोरोना लशीच्या किमती आणखी कमी करण्याची विनंती केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांकडे केली होती. सीरमने  आपल्या लशीची किंमत कमी केली आहे. आता भारत बायोटेक काय करणार याकडे लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Corona vaccine