मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING: महाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांना लस मिळणार नाही

BREAKING: महाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांना लस मिळणार नाही

No Vaccination from May 1: राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे पासून लस मिळणार नाहीये.

No Vaccination from May 1: राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे पासून लस मिळणार नाहीये.

No Vaccination from May 1: राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे पासून लस मिळणार नाहीये.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 28 एप्रिल: देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून लस (Vaccine) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. मात्र, राज्यातील नागरिकांना 1 मे पासून लस मिळणार नाहीये. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितलं की, राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना 1 मे पासून लस मिळणार नाही.

राज्यात 1 मे पासून लसीकरण नाही

महाराष्ट्रात 1 मे 2021 पासून लसीकरण सुरू होणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध नसल्याने सर्वांचे तात्काळ लसीकरण सुरू होणार नाही. सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. नागरिकांनी Co-win App वर नोंदणी करुनच लसीकरण केंद्रावर जावे असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रच नाही तर इतर राज्य सुद्धा पूर्णपणे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करतील असं मला तरी वाटत नाही. कारण, लसींचा साठा सर्व राज्यांकडे आवश्यक तितका नाहीये असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

वाचा: 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

लसीकरण केंद्र वेगवेगळे 

45 हून अधिक नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र असणार आहे आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र असणार आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं, "आज राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) निर्णय घेतला आहे की, राज्यातील 5 कोटी 71 लाख (18 ते 44 वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे."

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus