मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येचा खळबळजनक उलगडा; हॉटेलबाहेरचं कोयत्याने केले वार

पुण्यातील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येचा खळबळजनक उलगडा; हॉटेलबाहेरचं कोयत्याने केले वार

गारवाच्या मालकावर त्यांच्याच हॉटेलबाहेर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

गारवाच्या मालकावर त्यांच्याच हॉटेलबाहेर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

गारवाच्या मालकावर त्यांच्याच हॉटेलबाहेर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 22 जुलै : पुण्यातील प्रसिद्ध गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गारवा हॉलेटच्या शेजारी अशोका हॉटेल होतं. या हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार भाच्याला सुपारी देऊन गारबा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात लोणी काळभोर पालिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५६), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी (वय २१), अक्षय अविनाश दाभाडे (वय २७) करण विजय खडसे (वय २१), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय २३), गणेश मधुकर साने (वय २०) आणि निखिल मंगेश चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) यांची नावं आहेत. या प्रकरणात रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. दौंड) यांची हत्या करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील गारवा या हॉलेटचे मालक आखाडे यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्लाचं सीसीटीव्ही देखील समोर आलं होतं.

हे ही वाचा-प्रेम प्रकरण आर्मी जवानाच्या अंगाशी; पहिली पत्नी असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट

कशी केली हत्या

रविवारी रात्री आखाडे आपल्या हॉटेलच्या समोर खुर्चीत बसले होते. ते फोनवर बोलत होते. यादरम्यान काही अज्ञात चालत त्यांच्या दिशेने आले व त्यांनी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये आखाडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोण आहेत दोषी

बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल आहे. अशोका हॉटेल गारवा हॉटेलप्रमाणे फार चालत नव्हते. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्याची सुपारी दिली. आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देवू'' असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर बाप-लेकाने चौधरी याला सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केल्याची माहिती गुरुवारी (ता. २२) सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयास दिली.

त्या दिवशी 3 लाखांचा गल्ला

गारवाचा दररोजचा व्यवसाय 2 ते अडीच लाखांचा होता. तर अशोकाला साधारँ 50 ते 60 हजारांचा. मात्र ज्यादिवशी गारबा बंद असतं त्या दिवशी अशोकाचा व्यवसाय चक्क 3 लाखांपर्यंत जात होता. गारवा कायमचे बंद पडले तर व्यवसाय वाढेल या विचारातून खेडेकरांनी आखाडेंच्या हत्येची सुपारी दिली.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune