पुरंदर, 31 मार्च: कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लोणंदकरांनी गांधी चौकात सार्वजनिक ठिकाणी सॅनेटायझर (जंतुनाशक) फॉगिंग पॉईंट उभारण्यात आला आहे. या पॉईंटद्वारे दुचाकी व पादचारी यांच्या अंगावर स्प्रेप्रमाणे सॅनेटायझर फवारले जाऊन संसर्ग होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. लोणंद पॅटर्न म्हणून शहरातून व गावागावातून याची उभारणी केली जाऊ शकते, अत्यंत कमी खर्चात तयार केलेला हा जंतुनाशक हबचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा..कोरोनाच्या चाचणीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
कोरोना या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण देशातील व राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य, एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी, अहमद लोणंदवाला व सहकाऱ्यांनी तुर्की देशात उभारलेल्या सॅनेटायझर फॉगिंग पॉईंटप्रमाणे लोणंद येथे उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कामास सुरुवात केली व त्यासाठी नगरपंचायतने ही आर्थिक मदत केली.
हेही वाचा..अंगावर फाटकं रेनकोट, डोक्यावर हेल्मेट; कोरोनाग्रस्तावर असे उपचार करतायेत डॉक्टर
लोणंदच्या गांधी चौकात सुमारे एक हजार लिटर पाण्याच्या टाकीतील पाणी पाईपमधून खाली आणून सुमारे चार फुट रुंद सहा फुट उंच व दहा फुट लांब असा ट्रॅक तयार केला आहे. त्यामध्ये सहा ठिकाणी स्प्रे लावण्यात आले तर बटण दाबल्यानंतर दहा सेकंद संपूर्ण स्प्रे मोटारसायकल अगर पादचारी यांच्या संपूर्ण अंगावर तुषाराप्रमाणे पडून संपूर्ण शरीर व गाडीवर सॅनेटायझर पडून जंतुमुक्त अशी संकल्पना आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सॅनेटायझरचे प्रमाण मिसळले जाणार आहे.
हेही वाचा.. कोरोनाची कम्युनिटी लागण? ...तर सरकार रिकामे फ्लॅट, इमारती, हॉटेल घेणार ताब्यात
लोणंदच्या शंभर डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेली रक्षक क्लिनिक या पायलट प्रोजक्ट प्रमाणेच आता लोणंद येथील गांधी चौकात उभारलेला सॅनेटायझर फॉगिंग पॉईंट हा देशातील पहिला ठरणार असून लोणंद पॅटर्न म्हणून ओळखला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.