मुंबई 31 मार्च : कोरोनाची कम्युनिटी लागण होण्याचा धोका वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कठोर उपाययोजना करत असलं तरी कोरोना पसरण्याचा वेग थांबलेला नाही. काही घटनांमुळे कोरोना आता समाजतही खोलवर पसरू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गरज पडली तर रिकामे फ्लॅट, इमारती, हॉटेल, मंगलकार्यालय, लॉज, धर्मशाळा, क्लब, प्रदर्शन केंद्र, बँकवेट हॉल, मोठी जहाजं, राहण्याची सोय असलेल क्रूझ, यांना ताब्यात घेईल. त्याबाबतचा आदेश सरकार काढणार आहे. अशा ठिकाणी कोरोनामुळे बाधित झालेल्यांच्या संपर्कात आलेले आणि पण लक्षणं न दिसणाऱ्या लोकांना विलागीकरण करत ठेवलं जाणार आहे. स्थानिक वॉर्ड ऑफिसर आशा ठिकाणी जेवण आणि इतर आवश्यक बाबी पुरवणार आहेत. जर इथे कुणी विरोध केला तर मात्र कलाम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल. त्या वार्डातील वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर याबाबतीत कायदेशीर मदत करणार आहेत. भारतात (India) कोरोनाव्हायरस(coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 227 नवे रुग्ण आढळून आलेत. याचाच अर्थ दर तासाला 9 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भारताचा धोका आता वाढला आहे. हे वाचा - मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? – जावेद अख्तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 1251 वर पोहोचली आहे. सोमवारी राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला. हे वाचा - निजामुद्दीनच्या परिषदेत होते 1830 लोक, महाराष्ट्रासह 19 राज्यांत पसरला कोरोना देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते. आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्ली रुग्णालायत असणाऱ्या 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मृत्यू झालेल्यांपैकी सहा जण तेलंगणातील आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







