अजितदादा पुन्हा भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारण खळबळ उडवून दिली आहे.

आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारण खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:
पुणे, 27 डिसेंबर : 'अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असतात. या सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,' असा दावा करत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारण खळबळ उडवून दिली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. 'परवा मुख्यमंत्री मला म्हणाले की, आठवलेजी आता तुम्ही इकडे या. पण मी म्हणालो तुम्हीच इकडे या,' असं म्हणत आठवले यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकवला. मराठा आरक्षणावर काय म्हणाल रामदास आठवले? 'राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,' अशी भूमिका मराठा आरक्षणप्रश्नी रामदास आठवले यांनी घेतली. रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : - लोकशाहीच्या पद्धतीने आता पक्षात निवडणूक होणार - 14 जानेवारीच्या आधी ही निवडणूक पार पडेल - ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करत आहे - चंद्रकांत पाटील यांचं मिशन पूर्ण झाल्यावर ते कोल्हापूरला जाणार आहे - चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे आहे, पण आता पुण्यातच आहे - कोरेगाव भीमाप्रकरणी एकबोटेंना पकडलं होतं, भिडे यांच्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती. फडणवीसांच्या काळात पण चौकशी झाली होती. तेव्हा पोलिसांनी त्यांचा संबंध नाही असं सांगितलं होतं. पण त्यावेळी हे आताचे सरकार मधले म्हणत होते कारवाई करा, आता यांनी कारवाई करावी - एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली हे प्रशासनाचं काम, प्रशासन जसं सांगेल तसं करावं - सध्याच्या वातावरणात परिषद घेऊच नये, ऑनलाईन घ्यायला हरकत नाही - गो कोरोना म्हटलो तरी कोरोना पोहोचत आहे - आता मात्र नो कोरोना नो कोरोनाची मी घोषणा देत आहे - त्यामुळे तो येणार नाही, मात्र लोकांनी काळजी घ्यावी - शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे - सरकारने आडमुठे धोरण स्वीकारले नाही, चर्चेचे दरवाजे खुले आहेत - कायदे रद्द होणार नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांनी अट्टहास करू नये - नाहीतर कायदे रद्द करण्याची सुरुवात होईल - काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचा मुद्दा होता - आता त्यांचा विरोध होत आहे, सरकार कायद्यात काही बदल करण्याच्या विचार करत आहे
Published by:Akshay Shitole
First published: