• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • गाव वसलंही नाही अन् चोरटे हजर; पुण्यात उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपवर डल्ला

गाव वसलंही नाही अन् चोरटे हजर; पुण्यात उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपवर डल्ला

पुण्यातील एका ज्वेलरीच्या दुकानावर उद्घाटनाच्या दिवशीच चोरी झाली आहे. (File Photo)

पुण्यातील एका ज्वेलरीच्या दुकानावर उद्घाटनाच्या दिवशीच चोरी झाली आहे. (File Photo)

Crime in Pune: पुण्यातील एका ज्वेलरीच्या दुकानावर उद्घाटनाच्या दिवशीच चोरी झाल्याची घटना (theft in jewelry shop On inauguration day) उघडकीस आली आहे.

 • Share this:
  पुणे, 25 सप्टेंबर: पुण्यातील एका ज्वेलरीच्या दुकानावर उद्घाटनाच्या दिवशीच चोरी झाल्याची घटना (theft in jewelry shop On inauguration day) उघडकीस आली आहे. पुण्यानजीक असणाऱ्या लोणंद येथील लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी शॉपवर एका महिलेनं आणि पुरुष साथीदाराच्या मदतीने ही चोरी केली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कारदेखील जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत. ज्योत्स्ना सूरज कछवाय असं अटक केलेल्या 29 वर्षीय आरोपी महिलेचं नाव असून ती पुण्यातील आंबेगाव खुर्द येथील रहिवासी आहे. तर निलेश मोहन घुते (वय -34) असं अटक केलेल्या साथीदाराचं तो कात्रज परिसरातील गुजरवाडी फाटा येथील रहिवासी आहे. लोणंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा-ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील VIDEO; लिंकद्वारे घुसखोरी करत 'जेठालाल'चे कृत्य सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी ज्योत्स्ना आणि निलेश हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी नियोजन पद्धतीने ज्वेलरीच्या दुकानावर डल्ला मारला आहे. ऐन उद्घाटनाच्या दिवशी आरोपींनी दुकान लुटलं असून दुकानातील किमती ऐवज लंपास केला आहे. उद्घाटनाच्या दिवशीच दुकानात चोरी झाल्याने दुकान मालक देखील घाबरून गेले होते. याप्रकरणी त्यांनी दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एक महिला आणि पुरुष संशयास्पद हालचाली करताना आढळले. हेही वाचा-6 तासात मिळालं कर्माचं फळ; साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाची पोलिसांकडून उचलबांगडी यानंतर, दुकान मालकाने त्वरित लोणंद पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: