Home /News /aurangabad /

अवघ्या 6 तासात मिळालं कर्माचं फळ; साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाची पोलिसांकडून उचलबांगडी

अवघ्या 6 तासात मिळालं कर्माचं फळ; साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाची पोलिसांकडून उचलबांगडी

शेख जुनैद ऊर्फ बंबय्या शेख जुबेर असं अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

शेख जुनैद ऊर्फ बंबय्या शेख जुबेर असं अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

Crime in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ऐन साखरपुड्याच्या दिवशी अटक (groom arrest on his engagement day) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    औरंगाबाद, 25 सप्टेंबर: औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ऐन साखरपुड्याच्या दिवशी अटक (groom arrest on his engagement day) केल्याची घटना उघडकीस आली आहे.  अवघ्या सहा तासांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांत पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला तुरुंगवारी घडवली आहे. भावी नवरदेवाला साखरपुड्याच्या दिवशी तुरुंगवारी घडल्याने दोन्ही कुटुंबीयांवर नामुष्की ओढावली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे. शेख जुनैद ऊर्फ बंबय्या शेख जुबेर असं अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आरोपी जुनैदने शुक्रवारी पहाटे सातारा परिसरातून एक दुचाकी गाडी चोरली (Theft bike) होती. आरोपीनं 24 सप्टेंबर रोजी पहाटे विटखेडा येथील रहिवासी असणारे अनिल जाधव यांची हिरो होंडा डीओ ही दुचाकी चोरली होती. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपीने पहाटे पाच वाजता घटनास्थळी येऊन स्वत:ची गाडी घटनास्थळी सोडून जाधव यांची दुचाकी चोरून नेताना आढळला. हेही वाचा-ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील VIDEO; लिंकद्वारे घुसखोरी करत 'जेठालाल'चे कृत्य दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी आरोपीला हटकलं असता, आरोपीनं संबंधित गाडी आपली असल्याचं सांगत घटनास्थळावरून पोबारा केला होता. पण दुचाकीचे मालक अनिल जाधव यांनी दुपारी याप्रकरणाची फिर्याद पोलिसांना दिली. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हेही वाचा-कंडोमऐवजी करायचे प्लॅस्टिक पिशवीचा वापर; डोंबिवली गँगरेप प्रकरणात नवीन खुलासा विशेष म्हणजे, आरोपी जुनैदच्या आई वडिलांनी दोनच दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरवलं होतं. तसेच घरात साखरपुड्याची तयारी सुरू होती. अशात पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून अटक केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर नामुष्की ओढावली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असताना, आरोपीने अवघ्या काही तासात चोरीच्या गाडीचा कायापालट केल्याचं निदर्शनास आलं आहे. आरोपीने 2 हजार रुपये खर्च करत गाडीवर लाल रंगाचं रेडीयम लावून घेतलं होतं. तसेच गाडीच्या पुढच्या भागावर '302' हे हत्येचं कलम टाकलं होतं. आरोपी जुनैद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मारहाण आणि दुचाकी चोरीचे सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Theft

    पुढील बातम्या