जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील VIDEO; लिंकद्वारे घुसखोरी करत 'जेठालाल'चे विकृत कृत्य

मुंबईत ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील VIDEO; लिंकद्वारे घुसखोरी करत 'जेठालाल'चे विकृत कृत्य

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि...

मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या इयत्ता नववीच्या ऑनलाइन वर्गात अश्लील व्हिडीओ (Obscene video played during online class) सुरू केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर: कोरोना संसर्ग  (Corona pandemic) सुरू झाल्यानंतर देशभरात ऑनलाइन क्लास (Online class) घेतले जात आहेत. पण दरम्यान गुन्हेगारी वृत्तीच्या काही विद्यार्थ्यांकडून भलतेच उद्योग केले जात आहेत. अशातच मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या इयत्ता नववीच्या ऑनलाइन वर्गात अश्लील व्हिडीओ (Obscene video played during online class) सुरू केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकार पाहून शिक्षकांसह विद्यार्थिनींना धक्का बसला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी अशाप्रकारे अश्लील चाळे करत होता. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? मुंबईच्या धारावी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाइन पद्धतीने क्लासेस सुरू होते. ऑनलाइन पद्धतीने शिक्षक शिकवत असताना, एका अज्ञात तरुणाने बनावट नावाने संबंधित क्लासमध्ये घुसखोरी करत अश्लील व्हिडीओ सुरू केला होता. हा धक्कादायक प्रकार पाहून शिक्षकांसह विद्यार्थिनींना धक्का बसला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेठालाल गढा आणि एका मुलीच्या बनावट प्रोफाइल तयार करून आरोपींनी संबंधित क्लासमध्ये घुसखोरी केली होती. हेही वाचा- अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने पोलीस ठाण्यातच दिला जीव याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांच्या तक्रारीवरून शाहूनगर पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी 7 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यत तब्बल अकरा दिवस हा अश्लील प्रकार केला आहे. अखेर या घटनेची माहिती प्राचार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्. वर्गातील एका मुलीला संबोधून आरोपींनी हा अश्लील प्रकार केला आहे. ऑनलाइन क्लासची लिंक वर्गातील एका विद्यार्थ्यानेच आरोपींना पाठवल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींना क्लासची लिंक कुठून मिळाली? याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील मुंबईत बऱ्याच शाळेत असे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथील एका शाळेत देखील असाच प्रकार उघडकीस आला होता. आरोपींनी लिंकद्वारे क्लासमध्ये घुसखोरी करत एका अल्पवयीन मुलीला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात