पुणे, 12 सप्टेंबर: पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) शहराजवळ असणाऱ्या लिंगाळी याठिकाणी काल मध्यरात्री एक दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. लिंगाळी येथील एका मेडिकलचं (Robbery at medical shop) शटर उचकटून चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटात मेडिकलमधील लाखो रुपयांवर डल्ला मारला (Theft Rs 1.45 lakh) आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास 3 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. संबंधित घटना मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Robbery capture in CCTV) झाली असून यामध्ये तीन अज्ञात लोकं चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील दौंड महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ युनिटी मेडीकेअर नावाचं एक मेडिकल शॉप आहे. या मेडिकलच्या दुकानात 11 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी काही चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. भामट्यांनी मेडिकलचं कुलूप तोडून शटर उचकटलं आहे. यानंतर चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटात दुकानातील 1 लाख 45 हजार रुपयांची रोकड (robbed 1 lakh 45 thousand in just 2 minutes) लांबवली आहे. हेही वाचा- शिवसेनेच्या नेत्याचा जुगार अड्ड्यावर राडा; युवकानं जिंकलेली रक्कम हिसकावली अन्.. पायी आलेल्या तीन चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानाचं कुलूप तोडलं त्यानंतर शटर उचकटलं आहे. यानंतर दोन भामट्यांनी दुकानात प्रवेश करत दुकानाच्या समोरील आणि आतील बाजूला असणाऱ्या काउंटरमधील कुलूपबंद ड्रॅाव्हरमध्ये ठेवलेली 1 लाख 45 हजार रूपयांची रोकड लांबवली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही चोरीची घटना उघडकीस आली आहे. मेडिकलमधील कर्मचाऱ्यानं औषध विक्रीतून आलेली सर्व रक्कम एकत्रित दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती.
काल मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील लिंगाळी येथील एका मेडिकलचं शटर उचकटून चोरट्यांनी अवघ्या दोन मिनिटात मेडिकलमधील लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. pic.twitter.com/ADEvUa0OM8
— The मराठी Medium (@MarathiMedium) September 12, 2021
हेही वाचा- नाशिक: फक्त 20 रुपयांसाठी चिरला मजुराचा गळा, दोन दिवसानंतर हत्येचं उलगडलं गूढ युनिटी मेडीकेअर शॉपचे मालक दादा भाऊसाहेब लोणकर यांनी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसून येत असून ते सर्वजण 22 ते 30 वयोगटातील आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.