मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे: IAS अधिकाऱ्याच्या घरात जबरी दरोडा; भामट्यांनी लक्ष्मीपूजनात ठेवलेला 43 लाखांचा ऐवज लांबवला

पुणे: IAS अधिकाऱ्याच्या घरात जबरी दरोडा; भामट्यांनी लक्ष्मीपूजनात ठेवलेला 43 लाखांचा ऐवज लांबवला

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Robbery in Pune: पुण्यातील मुंढवा परिसरात राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला (Robbery) आहे. चोरट्यांनी तब्बल 43 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

पुणे, 06 नोव्हेंबर: ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील मुंढवा परिसरात जबरी चोरीची (Robbery in pune) घटना घडली आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात भामट्यांनी डल्ला मारला आहे. यावेळी चोरट्यांनी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड असा एकूण 43 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लांबवला (Theft 43 lakh worth ornaments and cash) आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जबरी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून भामट्यांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्यांचे पुत्र सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. दरम्यान गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपल्या घरातील सर्व सोनं लक्ष्मीपूजनासाठी ठेवलं होतं. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करत 43 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

हेही वाचा-पाडव्याच्या दिवशी कुटुंबाचा हृदय चिरणारा आक्रोश;सांगलीत तिघींचा ओढ्यात बुडून अंत

नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी डोईफोडे यांच्या घरात दोन नोकरांसह एकूण 8 जण गाढ झोपले होते. दरम्यान रात्री साडे अकरा ते पहाटे चारच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी बंगल्याच्या गेटचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अत्यंत शिताफीने हॉलच्या खिडकीचा गज कापून आतमध्ये प्रवेश केला. आणि लक्ष्मीपूजनासमोर ठेवलेले सर्व दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्‍याचे सेट अशा विविध प्रकारच्या दागिन्यांचा समावेश होता.

हेही वाचा-ठाणे: पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने बापलेकास बेदम मारहाण; लोखंडी रॉडने केले वार

चोरीची ही घटना उघडकीस येताच डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Pune, Robbery Case