मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला; भीषण अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत

चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला; भीषण अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत

स्वप्निल बाळू मापारी (वय-27) आणि आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय-62) असं मृत पावलेल्या मायलेकाची नावं आहेत. (फोटो-लोकमत)

स्वप्निल बाळू मापारी (वय-27) आणि आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय-62) असं मृत पावलेल्या मायलेकाची नावं आहेत. (फोटो-लोकमत)

Road Accident: रविवारी सकाळी पुणे-नगर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

शिरूर, 18 ऑक्टोबर: रविवारी सकाळी पुणे-नगर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. नगरहून येणाऱ्या भरधाव कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट दुभाजक तोडून दुसऱ्या मार्गिकेवर उलटला आहे. या कंटेनरखाली चिरडून आईसह मुलाचा जागीच मृत्यू (Mother and son died in road accident) झाला आहे. या अपघातानंतर पुणे-नगर महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरून बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

स्वप्निल बाळू मापारी (वय-27) आणि आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय-62) असं मृत पावलेल्या मायलेकाची नावं असून दोघंही पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील रहिवासी आहे. मृत मायलेक रविवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरून राळेगणसिद्धीला जात होते. दरम्यान नगरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरच्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी आई आणि मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

नेमका अपघात कसा घडला?

27 वर्षीय मृत स्वप्निल हा आपल्या 62 वर्षीय आईसह दुचाकीने पुणे नगर महामार्गावरून राळेगणसिद्धीला निघाले होते. दरम्यान नगरहून पुण्याच्या दिशेने एक भरधाव कंटेनर येत होता. सुसाट वेगात असणाऱ्या या कंटेनरने लेन बदलल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर थेट दुभाजकाला जाऊन धडकला. पण कंटेनरचा वेग अधिक असल्याने हा कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटला. याचवेळी समोरून स्वप्निल आणि त्याची आई दुचाकीवरून येत होते.

हेही वाचा-जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 25 व्या मजल्यावरून पडून झाला अंत

अशात अचानक दुभाजक तोडून आलेल्या कंटेनरखाली चिरडून मायलेकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पुणे-नगर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. विशेष म्हणजे मृत सुनिलचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. एकाच घरातील दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Death, Road accidents